पंकजा आणि धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर, रंगली शाब्दिक चकमक
 टीम मॅक्स महाराष्ट्र |  5 Feb 2021 6:33 PM IST
 X
X
X
माजी मंत्री पंकजा मुंडे आणि राज्याचे सामाजिक न्यायामंत्री धनंजय मुंडे हे बीडमध्ये एकाच व्यासपीठावर आले होते. निमित्त होते. संतश्रेष्ठ वामनभाऊंच्या पुण्यतिथी निमित्त, पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गडावरील महापूजेचे....धनंजय मुंडे यांच्या हस्ते महापूजा पार पडली.. दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी या व्यासपीठावर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे एकाच व्यासपीठावर आले आहेत.
आता ज्यांच्या हातात सत्ता मिळालीय ते नक्कीच चांगला विकास करतील यासाठी त्यांना शुभेच्छा..असं म्हणून पंकजा मुंडेंनी नाव न घेता धनंजय मुंडेंना टोला लगावला. तर तर पंकजा मुंडेंच्या शुभेच्छांना उत्तर देतांना धनंजय मुंडेंनी " त्यांनी विकासाची जबाबदारी दिलीच आहे तर त्यांना पुढेही अनेक वर्षे शुभेच्छा द्याव्या  लागतील" असे म्हणत पंकजा मुंडेंना टोला लगावला.
 Updated : 5 Feb 2021 6:33 PM IST
Tags:          Pankaja Munde   Dhanjay Munde   
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire
















