News Update
Home > Election 2020 > ‘वशीकरण स्पेशालिस्ट, तांत्रिक-मांत्रिक भाजपच्या चमूमध्ये दाखल’

‘वशीकरण स्पेशालिस्ट, तांत्रिक-मांत्रिक भाजपच्या चमूमध्ये दाखल’

‘वशीकरण स्पेशालिस्ट, तांत्रिक-मांत्रिक भाजपच्या चमूमध्ये दाखल’
X

भारताच्या हवाई संरक्षण दलात नुकतंच दाखल झालेलं राफेल लढाऊ विमान भाजपच्या चमत्कारिक कार्यक्रमांमुळेच अधिक प्रसिद्धीच्या झोतात राहीलं आहे. राफेल विमानाच्या अनावरण प्रसंगी देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पुजा करताना चक्क विमानाच्या चाकांखाली लिंबू ठेवले होतं. सोबतच विमानावर नारळ ही ठेवण्यात आला होता.

या घटनेनंतर सोशल मीडियावर भाजपचा वैज्ञानिक दृष्टीकोन संपुष्टात आला असल्याच्या टीका होताना दिसत आहे. सोबतच 'इसरो'च चांद्रयान लिंबू मिरची न लावल्यामुळेच यशस्वी न झाल्याची बोचरी टीकाही केली जात आहे.

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनीही राजनाथ सिंह यांच्यावर टीका करण्याची ही नामी संधी सोडली नाही. भाजपने अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची ऐशी तैशी!’ केली असल्याचं ट्वीट मुंडे यांनी केलं आहे.

https://twitter.com/dhananjay_munde/status/1181820756792991744

या ट्वीटमध्ये त्यांनी “देशाच्या रक्षणासाठी #Rafale आणलंय अन् राफेलच्या यशस्वी उड्डाणासाठी लिंबांचा उतारा ठेवला जातोय. वशीकरण स्पेशालिस्ट, सर्व तांत्रिक-मांत्रिक भाजपच्या चमूमध्ये दाखल झाले आहेत. आता आपल्या देशाला कोणाचीच नजर लागणार नाही.” अशी खोचक टीका केली आहे.

Updated : 9 Oct 2019 12:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top