Home > News Update > धडगाव प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांची बदली नको; निलंबीत करा - चित्रा वाघाची मागणी

धडगाव प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांची बदली नको; निलंबीत करा - चित्रा वाघाची मागणी

धडगाव प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांची बदली नको;  निलंबीत करा - चित्रा वाघाची मागणी
X

धडगाव पिडीत प्रकरणी दोषी पोलीस अधिकाऱ्यांची बदली करुन चालणार नाही तर या प्रकरणातील दोषी अधिका-यांना तात्काळ निलंबीत करण्याची मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे.

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातील खडक्या येथील एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला होता. विवाहितने गळफास लावत आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले होते, मात्र ही आत्महत्या नसून खून आहे, तसेच पीडितेवर बलात्कार (Sexual Assault) झाल्याचा आरोपही तिच्या वडिलांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे पीडितेच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता तिचा मृतदेह हा मीठाच्या खड्ड्यात होता. अखेर काल, शनिवारी तब्बल ४७ दिवसांनंतर पीडितेच्या पार्थिवावर आदिवासी रिती रिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. धडगाव पिडीत प्रकरणी दोषी पोलीस अधिका-यांची बदली करुन चालणार नाही तर या प्रकरणातील दोषी अधिकाऱयांना तात्काळ निलंबीत करण्याची मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे.

त्यांनी पिडीत महिलेच्या कुटुंबाची धडगाव मधील खडक्या गावात जावुन भेट घेतली. यावेळी मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या व्यथा सांगतांन तिच्या आई वडीलांना अश्रु अनावर झाले होते. या संपुर्ण प्रकार पोलीसांचे पुर्णत दुर्लक्ष झाल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास येत असुन यात वैद्यकीय अधिकारी दोषी असल्यास त्यांच्या चौकशीसाठी वैद्यकीय अधिकाऱयांचे पथक नेमण्याची मागणी सरकार कडे करणार आहे. याघटनेची दखल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतली असुन यातील दोषींना सोडल जाणार नसल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले आहे.

Updated : 21 Sep 2022 10:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top