Home > Election 2020 > 'शिखंडी सारखे वार करू नका' – देवेंद्र फडणवीस

'शिखंडी सारखे वार करू नका' – देवेंद्र फडणवीस

शिखंडी सारखे वार करू नका – देवेंद्र फडणवीस
X

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रावर शिक्का मारणाऱ्या नोटरीची टर्म संपल्याचं लक्षात आल्यानंतर काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज बाद करावा अशी मागणी विरोधकांनी केली होती.

निवडणूक निर्णय अधिकारी शेखर घाडगे यांच्याकडे या विषयावरील बंदद्वार सुनावणी झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा अर्ज मंजूर केला आहे. याप्रकरणी, मुख्यमंत्र्यांचे निवडणूक प्रतिनिधी संदीप जोशी यांनी फडणवीस यांच्या बाजुने आपलं मत व्यक्त केलं.

अखेर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांचा अर्ज मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांचे वकिल उदय डबले व रितेश कालरा यांनी दिली. विशेष म्हणजे निवडणूक अधिकाऱ्यांकडून अधिकृत ऑर्डरही देण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या शपथपत्रावर वापरलेला संबंधित नोटरीचा शिक्का कालबाह्य झाला आहे. त्यामुळे तो ग्राह्य धरता येणार नाही. मुख्यमंत्र्यांनी अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे निवडणूक विभागाने शुक्रवारी सायंकाळपर्यंत नोटीस बोर्डावर जाहीर केलेली नव्हती. ती ऑनलाईनही उपलब्ध नव्हती.

या संदर्भातही निवडणूक अधिकारी व सदर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. शुक्रवारी आक्षेपानंतर मुख्यमंत्र्यांच्या अर्जासोबत सादर केलेली कागदपत्र सील करण्यात आली. ती पंचांसमक्ष उघडावी, अशी मागणीही आशीष देशमुख व पवार यांनी पत्रकार परिषदेत केली होती.

दरम्यान मुख्यमंत्र्यांचा अर्ज ग्राह्य धरण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

‘शिखंडी सारखे वार करू नका, मर्दासारखे समोर येऊन लढा, नोटरीमध्ये काही चूक असेल तर ती नोटरीची आहे, उमेदवाराची त्यात काही चूक नाही, अर्ज योग्यच आहे, नोटरी नसली तरी फॉर्म रद्द होत नाही, असे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, ते दाखले आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जोडले आहेत.

Updated : 5 Oct 2019 2:16 PM GMT
Next Story
Share it
Top