दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी २३, २४, २५ जानेवारी रोजी आझाद मैदान येथे शेतकरी आंदोलन होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे २५ जानेवारीला या आंदोलनात सहभागी होणार आहेत. यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.
मुळात 2006 साली महाराष्ट्र सरकारने जो कायदा केला. तो कायदा केंद्राने केल्यानंतर त्याच्या विरुद्ध आंदोलन करत आहेत. महाराष्ट्राच्या कायद्यात शेतकरी फसवला गेला. तर त्याला जाण्याकरता कुठेही जागा नाही. केंद्राच्या कायद्यात त्याला जाण्याकरता एक फोरम देखील देण्यात आला आहे. असं असताना देखील केवळ बहती गंगा में हात धोण्याचं हे काम आहे. कुठेही महाराष्ट्रात या तीन कृषी कायद्याच्या संदर्भात एकही आंदोलन झालेलं नाही... असा दावा करत देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीवर सडकून टीका केली.