Home > News Update > शरद पवारांनी फडणवीसांना सत्तेचा मंत्र दिला का? संजय राऊत म्हणाले...

शरद पवारांनी फडणवीसांना सत्तेचा मंत्र दिला का? संजय राऊत म्हणाले...

शरद पवारांनी फडणवीसांना सत्तेचा मंत्र दिला का? संजय राऊत म्हणाले...
X

माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांची 31 मे ला भेट घेतली. या भेटीवर आता वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. या भेटीत नक्की काय झालं याचे तर्क वितर्क लावले जात आहेत. या संदर्भात आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया माध्यमांना दिली. यावेळी माध्यमांनी राऊत यांना शरद पवार यांनी फडणवीसांना सत्तेचा मंत्र दिला का? असा सवाल केला असता... राऊत यांनी

"सत्तेचा मंत्र नक्की दिला असेल. ज्याप्रकारे विरोधी पक्ष राज्यात गोंधळ निर्माण करत आहे, सरकारच्या कामात अडथळे निर्माण करत आहे, हे सर्व असंच सुरु राहिलं तर पुढील १०० वर्ष महाराष्ट्रात विरोधी पक्षाची सत्ता येणार नाही हे नक्कीच शरद पवारांनी सांगितलं असेल. अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Updated : 1 Jun 2021 7:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top