Home > News Update > तो नाना पटोलेंचा पब्लिसिटी स्टंट: देवेंद्र फडणवीस

तो नाना पटोलेंचा पब्लिसिटी स्टंट: देवेंद्र फडणवीस

तो नाना पटोलेंचा पब्लिसिटी स्टंट: देवेंद्र फडणवीस
X

महाराष्ट्रात अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे सिनेमे चालणार नाही. तसेच त्यांच्या सिनेमांची शूटिंग ही बंद पाडू असा इशारा काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यावर आपली प्रतिक्रिया देताना नाना पटोले यांना जोरदार टोला लगावला आहे.

"नाना पटोलेंचा हा पब्लिसिटी स्टंट आहे. त्यांना माहितीये की अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांच्यावर काही बोललं, तर पब्लिसिटी मिळते. यात त्यांचंच भलं आहे. नवेनवे अध्यक्ष झाले आहेत. त्यांनाही त्यांचं नाव कमवायचं आहे. त्यामुळे त्यांना वाटतं की दिवसभर पब्लिसिटी मिळते. शूटिंग कसं आणि कोण बंद करू शकतं? इथे कायद्याचं राज्य आहे. तुम्ही सत्तारूढ पक्षाचे आहात याचा अर्थ असा नाही की तुम्ही मालक झालात' अशी टीका फडणवीस यांनी पटोले यांच्यावर केली आहे.

काय म्हणाले नाना पटोले?

कॉंग्रेस चे नवनिर्वाचित अध्यक्ष नाना पटोले आज अध्यक्ष पद स्विकारल्यानंतर प्रथमच भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांचं अध्यक्ष झाल्यानंतर जिल्ह्यात जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात आज नाना पटोले यांच्या नेतृत्वात लाखनी ते भंडारा ट्रॅक्टर मार्च सह पदयात्रा याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात अमिताभ बच्चन व अक्षय कुमार चे पिक्चर चालणार नाही व शूटिंग व देखील बंद पाडू असा इशारा दिला आहे. पेट्रोल डिझेलची दरवाढ, गॅसची दरवाढ यामुळं सामान्य माणसाचं जगणं मुश्किल झालेलं आहे. आम्ही कालही सांगितलं ज्यावेळी मनमोहन सिंह यांचं सरकार होतं. त्यावेळेस अभिताभ बच्चन असतील, अक्षय कुमार असेल हे टिवटिव करायचे. ट्विट च्या माध्यमातून टीका करायचे. आज ते गप्प का आहेत? महाराष्ट्रामध्ये अभिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचा पिक्चर आणि शुटींग महाराष्ट्रात चालू देणार नाही.

Updated : 18 Feb 2021 12:33 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top