Home > News Update > अध्यक्ष निवड: फडणवीस म्हणतात... आमचं मनोरंजन होतंय

अध्यक्ष निवड: फडणवीस म्हणतात... आमचं मनोरंजन होतंय

अध्यक्ष निवड: फडणवीस म्हणतात... आमचं मनोरंजन होतंय
X

नाना पटोले यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. त्यावरुन पुन्हा एकदा महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल असा सामना रंगण्याची चिन्ह आहे. नवीन अध्यक्षांच्या निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीवर टीका करताना फडणवीस यांनी . आपला उमेदवार पडतोय की काय, याचीच सरकारला जास्त भिती आहे. पण चांगलं आहे. यामुळे आमचं मनोरंजन होतंय आणि आमदारांचं भलं होतंय', असं म्हणत महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.

पाहा काय म्हटलंय फडणवीसांनी? 'सरकारकडे प्रचंड बहुमत असताना सरकार घाबरत का आहे. आपल्याच आमदारांना इतकं घाबरणारं सरकार मी पहिल्यांदाच पहातो आहे. हे घाबरट सरकार आहे. नियमावलीनुसार विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्यपाल आधी तारीख ठरवून पाठवतात. ती निवडणूक सिक्रेट बॅलटने होते. पण गेल्या काही दिवसांमधल्या चर्चा पाहिल्या, तर हे सरकार आपल्याच आमदारांना घबरत असल्याचं दिसतंय. आपला उमेदवार पडतोय की काय, याचीच सरकारला जास्त भिती आहे. पण चांगलं आहे. यामुळे आमचं मनोरंजन होतंय आणि आमदारांचं भलं होतंय', असा खोचक टोला फडणवीस यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.

Updated : 18 Feb 2021 12:50 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top