Home > News Update > देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा कोरोनाची लागण

देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा कोरोनाची लागण

देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा कोरोनाची लागण
X

गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांच्या (Covid Case Increase) संख्येत वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. त्यापार्श्वभुमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

जगभरात मंकीपॉक्सने (Monkey pox) धुमाकुळ घातला असताना देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढले आहे. त्यातच गेल्या 24 तासात देशात 4 हजार 270 नव्या कोरोना रुग्णांची (Covid 19) नोंद झाली आहे. तर 15 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे राज्यातही अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती त्यांनी आपल्या ट्वीटरवरून दिली.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून मी गृह विलगीकरणात आहे. याबरोबरच मी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी आणि काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.


Updated : 5 Jun 2022 8:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top