देवेंद्र फडणवीस यांची विरोधीपक्षनेतेपदी निवड

news, Devendra Fadnavis,

भाजपचे विधीमंडळ गटनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे सलग ५ वर्ष राज्याचे मुख्यमंत्री राहीलेले फडणवीस हे आता विरोधी बाकांवरच्या पक्षाचं नेतृत्व करणार आहेत.

हे ही वाचा
मातोश्री मध्ये बसून कामं करणं खूप सोपं असतं – नितेश राणे
‘हे’ सरकार फक्त ५ वर्ष नाही तर, ५० वर्ष टिकेल – छगन भुजबळ
हे तेच अजित पवार आहेत का?

राज्यात महाविकासाआघाडीचं सरकार स्थापन होत आहे. उद्या शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांची आज विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे.