Home > News Update > 'रूग्णालयातील आगीच्या भंडारासह राज्यात अनेक घटना घडूनही सरकारने कोणताही धडा घेतलेला नाही' - फडणवीस

'रूग्णालयातील आगीच्या भंडारासह राज्यात अनेक घटना घडूनही सरकारने कोणताही धडा घेतलेला नाही' - फडणवीस

रूग्णालयातील आगीच्या भंडारासह राज्यात अनेक घटना घडूनही सरकारने कोणताही धडा घेतलेला नाही -  फडणवीस
X

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा रुग्णालयात काल एक अतिशय मोठी दुर्घटना घडली. जिल्हा रुग्णालयास भीषण आग लागून त्यात ११ जणांचा मृत्यू झाला. तर, अन्य काहीजण जखमी देखील झाले. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ही आग लागल्याची घटना घडली. या विभागात एकूण १७ रुग्ण उपचार घेत होते आणि हे सर्व रुग्ण कोरोनाबाधित होते. या दुर्घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. तर, या घटनेची चौकशी करण्यासाठी आता चौकशीसाठी विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेवरून आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

" रूग्णालयातील आगीच्या भंडारासह राज्यात अनेक घटना घडूनही सरकारने कोणताही धडा घेतलेला नाही. अहमदनगरच्या घटनेमध्ये पोलिसांनी जे सीसीटीव्ही फुटेज घेतले आहे , त्यात आग सीलिंगमधून सुरू झालेली दिसते, महापालिकेकडून फायर सेफ्टी प्राप्त नाही. वायरिंगबाबत इलेक्ट्रीकल अभियंत्याने कळविलेले, हायड्रेशन आणि स्प्रिंकलर प्रणालीला आर्थिक मंजुरी आरोग्य आयुक्तांकडे काही महिन्यांपासून प्रलंबित. नगर सामान्य रूग्णालयाची ही आहे दुरावस्था. ११ निष्पाप बळी घेणार्‍या सर्वच दोषींवर कठोर कारवाई व्हावी. शेवटी कुणी जबाबदारी घेणार की नाही?" असं ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकार जोरदार टीका केली

सोबतच त्यांनी म्हटले आहे की, "अहमदनगर येथे जिल्हा रूग्णालयात आयसीयू कक्षात लागलेल्या भीषण आगीची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला व्यथित करणारी आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या शोकसंवेदना आहेत. त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमींना लवकर बरे वाटावे, अशी मी प्रार्थना करतो. अशा शब्दांमध्ये फडणवीस यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे."

Updated : 7 Nov 2021 3:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top