Home > News Update > देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांचा एकाच गाडीतून प्रवास

देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांचा एकाच गाडीतून प्रवास

देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांचा एकाच गाडीतून प्रवास
X

मुख्यमंत्र्यांच्या आजी-माजी आणि भावी सहकारी वक्तव्यावरुन राजकीय तर्क वितर्कांना सुरूवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी एकाच गाडीतून प्रवास केला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे दिवंगत माजी आमदार पी. के. अण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील उपस्थित होते. हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. पण या कार्यक्रमाच्या ठिकाणी येताना आणि जातानाही या दोन्ही नेत्यांनी एकाच गाडीतून प्रवास केला.यावेळी जयंत पाटील यांना मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत नाराजी आहे का, असा सवाल पत्रकारांनी विचारला तेव्हा, महाविकास आघाडीत कोणतीही नाराजी नाही, असे स्पष्ट केले. तसेच कार्यक्रमांमध्ये असे होतच असते. ते फार मनावर घेऊ नये, असेही जयंत पाटील यांनी सांगितले. पण या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांचा एकत्र प्रवास हाच चर्चेचा विषय ठरला.

Updated : 18 Sep 2021 11:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top