Home > News Update > राज्यांच्या आणि पक्षांच्या सीमा आमच्या या आदर्शाच्या सन्मानाआड कधीही येणार नाहीत- फडणवीस

राज्यांच्या आणि पक्षांच्या सीमा आमच्या या आदर्शाच्या सन्मानाआड कधीही येणार नाहीत- फडणवीस

कर्नाटकातील बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेबाबत देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे

राज्यांच्या आणि पक्षांच्या सीमा आमच्या या आदर्शाच्या सन्मानाआड कधीही येणार नाहीत- फडणवीस
X

मुंबई // कर्नाटकातील बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेबाबत राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील या घटनेप्रकरणी पंतप्रधान मोदींनी दखल घेण्याची मागणी केली आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.

भाजपशासित कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं विटबंन करण्यात आल्याने या घटनेचे राजकीय पडसादही उमटलेत. शिवसेनेनं भाजपच्या कार्यालयाबाहेरही निदर्शनं केली. दिवसभर भाजप नेत्यांनी या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. अखेरीस रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून घटनेचा निषेध नोंदवला.

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्र नाही,तर संपूर्ण देशाचे दैवत आहेत. राज्यांच्या आणि पक्षांच्या सीमा आमच्या या आदर्शाच्या सन्मानाआड कधीही येणार नाहीत. त्यामुळे देशाच्या कुठल्याही भागात शिवछत्रपतींचा अवमान होत असेल तर या विकृतीचा निषेधच, असं म्हणत फडणवीस यांनी निषेध नोंदवला.

तसंच, 'ज्यांनी संपूर्ण राष्ट्र एकसंध केले, अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन केला जाणार नाही असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईजी यांनीही स्पष्ट केले. या प्रकरणातील काही आरोपींना अटक झाली आहे. आणखीही सत्य बाहेर येईलच, असंही फडणवीस म्हणाले.विशेष म्हणजे, फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बौमय्या यांचे ट्वीट रिट्वीट करून आपली प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे. 'छत्रपती शिवाजी महाराज केवळ आमचेच नाहीत तर सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस आणि विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतः यात लक्ष घालावे आणि तेथील राज्य शासनाला त्वरित संबंधितांवर कडक कारवाई करण्यास सांगावे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Updated : 19 Dec 2021 1:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top