Home > News Update > सरकार वाचवण्यासाठी पोलिसांच्या बदल्यांच्या रॅकेटकडे मुख्यमंत्र्यांचे दुर्लक्ष - देवेंद्र फडणवीस

सरकार वाचवण्यासाठी पोलिसांच्या बदल्यांच्या रॅकेटकडे मुख्यमंत्र्यांचे दुर्लक्ष - देवेंद्र फडणवीस

सरकार वाचवण्यासाठी पोलिसांच्या बदल्यांच्या रॅकेटकडे मुख्यमंत्र्यांचे दुर्लक्ष - देवेंद्र फडणवीस
X

परमबीर सिंग यांच्या पत्रप्रकरणी राज्य सरकार कोंडीत सापडलेले असताना आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात पोलीसदलात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे एक रॅकेट उघड झाले होते, पण मुख्यमंत्र्यांना माहिती देऊनही त्यांनी काहीही कारवाई केली नाही असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. याप्रकरणात काही आयपीएस अधिकारी, राजकारणी यांची देखील नावे समोर आली आहेत. पण सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. आपल्याकडे यासंदर्भातले सगळे पुरावे आहेत आणि आपण आता तातडीने दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहसचिवांकडे सीबीआय चौकशीची मागणी करणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

गृहखात्याच्या कामांसंदर्भात फक्त परमबीर सिंग यांनीच तक्रार केली होती असे नाही, तर पोलीस महासंचालतकांनीही तक्रार केली होती, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. या रॅकेटमध्ये गृहमंत्री, काही अधिकारी आणि इतरही काही नेत्यांचे संबंध दिसत आहेत. पण पोलीस महासंचालकांनी सीआयडी चौकशी करण्याची मागणी करुनही मुख्यमंत्र्यांनी चौकशी केली नाही. उलट हे प्रकरण बाहेर काढणाऱ्या अधिकारी रश्मी शुक्ला यांना त्रास देण्यात आला आणि त्यांना प्रमोशनही देण्यात आले नाही असा आरोपही फडणवीस यांनी केला आहे.

फडणवीसांचा नवा आऱोप काय?

पोलीस दलात बदल्यांचे रॅकेट सुरू असल्याची माहिची गुप्तचर विभागाच्या आयुक्तांना मिळाली होती, या रॅकेटअंतर्गत अधिकाऱ्यांशीही बोलणी सुरु होती, हे लक्षात आल्यानंतर गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पोलीस महासंचालकांना याची माहिती दिली. यानंतर पोलीस महासंचालकांनी केंद्रीय गृहसचिवांच्या परवानगीनंतर काही लोकांचे कॉल इंटरसेप्शट म्हणजे टॅप केले गेले. त्यातून बदल्यांच्या रॅकेटची माहिती उघड झाली आणि अनेक अधिकारी आणि राजकीय लोकांची नावं निष्पन्न झाली, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याविषयी कळल्यानंतर त्यांनी फक्त चिंता व्यक्त केली. मात्र, यावर कारवाई करण्याऐवजी हा अहवाल त्यांनी गृहमंत्रालयाकडे पाठवला. त्यानंतर गृहमंत्रालयाने कारवाईऐवजी गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्तांनाच शिक्षात बढती दिली नाही. त्यानंतर गुप्तचर विभागाला मिळालेल्या माहितीप्रमाणेच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या, असा आरोपही फडणवीस यंनी केला आहे.

Updated : 23 March 2021 6:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top