रेमडीसीवीरचं राजकारण, देवेंद्र फडणवीसांचे गृहमंत्र्यांना उत्तर
X
रेमडीसीवीरच्या पुरवठ्यावरुन सध्या राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. ब्रुक फार्मा कंपनीच्या अधिकाऱ्याला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. याला फडणवीस यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर पोलिसांच्या कामात हस्तक्षेप केला तर कारवाई करु, असा इशारा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला होता. याला आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. कुणीही रेमडीसीवीरबाबत अफवा पसरवू नये, रेमडेसिवीर भाजपसाठी नाही, महाराष्ट्रासाठी मागत होतो, म्हणूनच मंत्र्यांसोबत बैठक झाली. तसेच ब्रूक फार्मा कंपनीकडे साठा असेल तर पुरावे द्या, असे आव्हानही त्यांनी राज्य सरकारला दिले आहे. बाकी धमक्यांना आपण घाबरत नाही, जनतेसाठी कितीही केसेस लागल्या तरी त्याची आपण पर्वा करत नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
ब्रुक फार्मा कंपनीच्या अधिकाऱ्याला 50 हजार रेमडीसीवीर इंजेक्शनचा साठा केल्याप्रकरणी पोलिसांनी चौकशीला बोलावले होते. या साठा भाजप नेत्यांच्या सांगण्यावरुन महाराष्ट्रात आणला गेला, अशी चर्चा आहे. पण फडणवीस यांनी अन्न आणि औषध प्रशासान विभागाच्या परवानगीनंतर महाराष्ट्रासाठी हा साठा आणण्याचे प्रयत्न करत होतो, असे स्पष्टीकरण दिले आहे.