Home > News Update > अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, देवेंद्र फडणवीस भडकले

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, देवेंद्र फडणवीस भडकले

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, देवेंद्र फडणवीस भडकले
X

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला. त्याबरोबरच छगन भुजबळ आणि नाना पटोले यांनी यावर प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देत असतान देवेंद्र फडणवीस चांगलेच भडकले.

गेल्या तीन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीकडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लक्ष वेधले. त्याबरोबरच नाना पटोले आणि छगन भुजबळ यांनीही शेतकऱ्यांची विदारक स्थिती सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.

यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, राज्यात पाच दिवसात हवामान विभागाने अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र या पावसाने पीकं भुईसपाट झाले आहेत. त्यामध्ये कांदा, गहू, ऊस, टोमॅटो, द्राक्षे अशा अनेक पिकांना फटका बसला आहे. त्याबरोबरच विजा पड़ून शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांनासुध्दा त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे अक्षरशः शेतकरी स्वतः आत्मक्लेश करतोय. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला आहे. त्यामुळे सरकार तातडीने यावर काय भूमिका घेणार? याबाबत सरकारने खुलासा करण्याची मागणी केली. मात्र यावर स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून यावर चर्चा होणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

त्याबरोबरच नाना पटोले म्हणाले, सरकारने शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट करायला हवी. कारण गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी वीज कापणार नसल्याचे म्हटले होते. मात्र नागपूर विभागात 9 हजार 957 शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज कापली आहे. कांद्याची खरेदी अजूनही झाली नाही. कापूस शेतकऱ्याच्या घरात पडून आहे. त्या कापसाला उलटे रोग लागले आहेत. त्यामुळे इतर कामकाज बाजूला सारून सरकारने यावर चर्चा करावी, अशी मागणी केली.

त्यानंतर छगन भुजबळ म्हणाले, शेतीचे नुकसान झाले आहे. शेतकरी उध्वस्त झाला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गावच विकायला काढले आहे. त्यामुळे सरकार यावर काय निर्णय घेणार? याविषयी प्रश्न विचारला. तसेच गुजरात सरकारने कांद्यावर अनुदान दिले आहे. मात्र राज्यात नाफेड अजूनही बाजार समितीच्या बाहेर माल खरेदी करीत आहे. त्यामुळे याकडे सरकारने गांभिर्याने पाहण्याची मागणी केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विविध भागात झालेल्या नुकसानीची माहिती सभागृहात दिली.

कोणत्या विभागात किती नुकसान?

राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची तातडीने माहिती मागवली आहे. आठ जिल्ह्यांमध्ये 13 हजार 729 हेक्टर नुकसान झाले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड आणि जव्हार तालुक्यात 760 हेक्टरचे आंबा आणि काजूचे नुकसान झाले आहे.

नाशिक जिल्ह्यातील नाशिक, त्र्यंबकेश्वर, कळवण आणि निफाड या जिल्ह्यात 2 हजार 685 हेक्टर गहू, भाजीपाला, द्राक्षे आणि आंब्याचे नुकसान झाले आहे.

धुळे जिल्ह्यातील साक्री,सिंदखेडा, शिरपूर तालुक्यात 3 हजार 144 हेक्टरचे ज्वारी, केळी, पपई, मका, हरभरा या पिकांचे नुकसान झाले आहे.

नंदूरबार जिल्ह्यात 1576 हेक्टरवर पीकांचे नुकसान झाले आहे.

जळगावमध्ये 214 हेक्टरवर ज्वारी, गहू, केळी या पिकांचे नुकसान झाले आहे.

अहमदनगर जिल्ह्यात 4 हजार 100 हेक्टरचे नुकसान झाले आहे.

बुलढाणा जिल्ह्यात 775 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे.

वाशिम जिल्ह्यात 475 हेक्टकवर नुकसान झाले आहे.

त्यामुळे राज्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणावर नुकसा झाले आहे. यावेळी बोलताना इतर अनेक जिल्ह्यातील माहिती बाकी असल्याचे सदस्यांनी सांगितले. त्यानंतर आतापर्यंत आलेल्या माहितीचे विवेचन केले आहे. मात्र तुम्ही प्रश्न विचारत आहात तर तुमच्या काळात चक्रीवादळाने नुकसान झालेले पैसे अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाहीत, असं म्हणत देवेंद्र फडणवीस भडकल्याचे पहायला मिळाले.

Updated : 8 March 2023 7:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top