Home > News Update > विरोधी पक्ष विविध मुद्दे काढून राज्याला मुद्दाम अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे- अजित पवार

विरोधी पक्ष विविध मुद्दे काढून राज्याला मुद्दाम अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे- अजित पवार

विरोधी पक्ष विविध मुद्दे काढून राज्याला मुद्दाम अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे- अजित पवार
X

पंढपूर// मागील ६० वर्षात कधी एसटीच्या सरकारमध्ये विलीनीकरण मुद्दा समोर आला नव्हता. मात्र मुद्दामुन हा प्रश्न चिघळवला जात आहे.असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. राज्यातील विरोधी पक्ष विविध मुद्दे काढून राज्याला मुद्दाम अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. असं पवार म्हणाले. सोबतच एसटी विलनीकरण केले तर राज्यातील सर्व महामंडळाचे कर्मचारी देखील अशी मागणी करतील असे म्हणत अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, कोतवाल, पोलीस पाटील हे देखील मागणी करू शकतात असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

पंढपुरात विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. महापूजेनंतर मंदिर समितीने घेतलेल्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ औसेकर महाराज, कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, मंडळ अधिकारी विजय शिवशरण उपस्थित होते.

Updated : 15 Nov 2021 2:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top