Home > News Update > महाविद्यालयीन प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांच्या ७५ टक्के मागण्या मान्य...

महाविद्यालयीन प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांच्या ७५ टक्के मागण्या मान्य...

राज्यातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून उपोषण सुरु आहे. मात्र त्यावर पूर्णपणे तोडगा अद्यापही निघालेला नाही. पण उपोषणकर्त्यांच्या ७५ टक्के मागण्या पूर्ण झाल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. आणि उर्वरित मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे सुद्धा पाटील यांनी सांगितले.

महाविद्यालयीन प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांच्या ७५ टक्के मागण्या मान्य...
X

महाविद्यालयीन प्राध्यापकेतर कर्मचारी संघटनेच्या एकूण प्रलंबित मागण्यांपैकी ७५ टक्के मागण्या मान्य होण्याच्या बेतात आहेत. शासनाकडून तसे संकेतही देण्यात आले आहेत. पण मोघम आश्वासनावर आम्ही विश्वास ठेवणार नाही. जोवर स्पष्ट आणि लिखित स्वरुपात आश्वासन शासनाकडून दिले जाणार नाही तोवर आमचे आंदोलन सुरु राहणार असल्याचे कर्मचारी संघटनेच्या नेत्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यांनी संबंधित अधिकार्‍यांकडून पूर्तता करुन घेतो असे सांगितले. तुम्ही सांगितले तर एका रात्रीत सर्व औपचारिकता पूर्ण होईल, असे संघटनेतर्फे सांगण्यात आले. याबाबतची लवकरच पूर्तता करण्याचे आश्वासन शासनाकडून उपोषणकर्त्यांना देण्यात आले आहे. मात्र यावेळी आम्ही सावध असून,ठोस कार्यवाही झाल्याशिवाय मागे हटणार नाही, असे कर्मचारी संघटनेने सांगितले आहे.

राज्यातून आम्हाला विविध संघटनांचा पाठिंबा मिळत असल्याची माहिती महाविद्यालयीन प्राध्यापकेतर कर्मचारी संघटनेच्यावतीने देण्यात आली आहे. आमची लढाई न्याय हक्कांसाठी आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचारी फेडरेशनचे अध्यक्ष डॉ.आर.बी.सिंह यांनी केले. प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात, अशा मागण्यांसाठी येथील एसपीडीएम महाविद्यालयातील प्राध्यापकेतर कर्मचार्‍यांनी १६ फेब्रुवारीला लाक्षणिक संप पुकारला असून तेथे डॉ. सिंह यांनी भेट दिली. लाक्षणिक संपानंतरही शासनाने मागण्यांकडे लक्ष न दिल्यास २० फेब्रुवारीपासून बेमुदत संप पुकारला जाणार आहे. डॉ.सिंह यांनी शिरपूरच्या संघटना पदाधिकार्‍यांचे कौतुक केले.

किसान विद्या प्रसारक संस्थेचे विश्वस्त तथा महाविद्यालयाचे कुलसचिव रोहित रंधे, माजी प्राचार्य डॉ.एस.एन.पटेल, प्राचार्य डॉ.एस.एस.राजपूत यांनी त्यांचे स्वागत केले. संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील, उपाध्यक्ष सुनील थोरात, कार्याध्यक्ष शशिकांत सूर्यवंशी, ज्येष्ठ सल्लागार शालिकराव तिरमले, सचिव हिंमतराव तुंगार, कार्यालय अधीक्षक एस.एन.निकम, कनिष्ठ लिपीक डॉ.सी.पी.ठाकूर, प्रयोगशाळा परिचर डी.बी.ढिवरे, यू.पी.पावरा, एस.एस.पाटील, एस.टी.न्हावी, के.जी.गोस्वामी, टी.व्ही.बोरसे, एस.एम.पाटील, एस.यू.चौधरी, एस.बी.करंकाळ, एल.एल.वाणी, एन.एन.गिरासे, एन.एल.गुजर, जी.एन.पाटील आदि उपस्थित होते.

Updated : 17 Feb 2023 8:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top