Home > News Update > मागितला हमीभाव,मिळाला जीएसटी"

मागितला हमीभाव,मिळाला जीएसटी"

मागितला हमीभाव,मिळाला जीएसटी
X

"मागितला हमीभाव,मिळाला जीएसटी" "स्वाभिमानी"चा धनधान्यांवर जीएसटी आकारणीस तीव्र विरोध.. प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची तयारी.. केंद्र सरकारने गहू, तांदूळ,तृणधान्ये, सोयाबीन, मटार यावर ५ टक्के GST लागू केल्याचा निर्णय अन्यायकारक असा आहे.. या निर्णयामुळी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले जाणार असुन या निर्णयाचा शेतकर्‍यांना देखील 'काडीचाही' फायदा होणार नाही म्हणुनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा केंद्राच्या या निर्णयास विरोध आहे, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी राज्य प्रवक्ते रणजित बागल यांनी व्यक्त केले..

"केंद्र सरकारने या धनधान्याची GST आकारणी केल्याने फक्त सरकारची स्वतःची तिजोरी भरली जाणार आहे.. आणि नंतर ती तिजोरी मोठमोठे उद्योगपती व दलालांची कर्जे माफ करण्यासाठी खाली केली जाते हे ही तितकंच त्रिकालाबाधित सत्य आहे.. केंद्र सरकारने या धान्यांवर जीएसटी लावल्याने गरिबांचे अन्न खाणे देखील मुश्कील होणार आहे.. धनधान्यांवर जीएसटी लावण्यापेक्षा राजु शेट्टींनी जी वारंवार शेतकऱ्यांच्या शेतीमालाला थेट शेतकर्‍यांना किमान आधारभूत किंमत (हमीभाव) द्यावा ही मागणी केली आहे त्याची अंमलबजावणी करून शेतकर्‍यांच्या उन्नतीचे प्रयत्न केले जावेत व त्यांना दिलासा दिला जावा." असे बागल यावेळी बोलताना म्हणाले..

केंद्र सरकारकडुन खते बीबियाणे यांची दरवाढ करून शेतकर्‍यांना अडचणीत आणले जात आहे. आता सरकार सर्वसामान्यांच्या ताटात माती कालवु पाहत असेल तर देशात गरीब आणि सर्वसामान्य जनतेचा या सरकारच्या विरोधात उद्रेक होईल. जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्यावर वारंवार कराचे बोझे चढवून हे सत्ताधारी देश हुकुमशाहीकडे नेवू पाहत आहेत. अशा गरीबविरोधी निर्णयास स्थगिती द्यावी अन्याय देशातील सर्वसामान्य त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरेल. तेव्हा सरकारची देखील पळताभुई थोडी होईल" असेही बागल यांनी यावेळी सांगितले..

Updated : 19 July 2022 2:42 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top