मुंबई // विधिमंडळाच्या आवारात निदर्शने करताना भाजप आमदार नितेश राणे यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांना हिणवण्यासाठी असभ्यपणे आवाज काढल्याचा व असे प्रकार रोखण्याची गरज असल्याचा विषय शुक्रवारी विधानसभेत शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी उपस्थित केला. त्यास पाठिंबा देत आमदारांचे सभागृहाबाहेरील वर्तन कसे असावे याची आचारसंहिता तयार करण्यासाठी समिती नेमण्याची मागणी भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली. विधान भवनाच्या पायऱ्यांवर भाजपचे आमदार बसून आंदोलन करीत असतानाच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे येताच "म्याव.. म्याव" असा आवाज काढण्यात आला. यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे यांना ट्वीट करून डिवचले. त्याचे पडसाद शुक्रवारी विधानसभेत उमटले. शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी हा मुद्दा उपस्थित करीत संबंधित आमदाराच्या विरोधात कारवाईची मागणी केली. अशा पद्धतीने नक्कल व आवाज काढणे चुकीचे असल्याचे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. कोणाचीही मानहानी होणार नाही याची सर्वांनीच खबरदारी घेतली पाहिजे, असे सांगत फडणवीस यांनी स्वपक्षीय आमदाराचे कान टोचले.
News Update
- औरंगाबादचे नामांतर होणार का? राजेश टोपे यांनी स्पष्ट केला सरकारचा अजेंडा
- ज्ञानवापीः मस्जिद की मंदीर आज होणार फैसला
- मुंबई सत्र न्यायालय परीसरातील इमारतीला मोठी आग
- सर्वसमावेशक आर्थिक विकासाचे जनक बुद्ध
- त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, विनोद तावडेंना दिली मोठी जबाबदारी
- #BigBreaking केतकी चितळेची १८ मेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी
- #KetakiChitale; शरद पवारांवरील टीका भोवली ; अभिनेत्री केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात
- #Wheat_Export_Ban गव्हाच्या निर्यातीवर अखेर बंदी, वाढत्या किमतीनंतर सरकारचा मोठा निर्णय
- Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव, 27 लोकांचा मृत्यू
- आरोग्य भरती संदर्भात लवकर परीक्षा घेतली जाईल: राजेश टोपे आरोग्यमंत्री

Home > News Update > मंत्री आदित्य ठाकरेंना चिडविल्याने शिवसेना आक्रमक, विधान भवनात आचारसंहिता लागू करण्याची मागणी
मंत्री आदित्य ठाकरेंना चिडविल्याने शिवसेना आक्रमक, विधान भवनात आचारसंहिता लागू करण्याची मागणी
विधिमंडळाच्या आवारात निदर्शने करताना भाजप आमदार नितेश राणे यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांना हिणवण्यासाठी असभ्यपणे आवाज काढल्याचा व असे प्रकार रोखण्याची गरज असल्याचा विषय शुक्रवारी विधानसभेत शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी उपस्थित केला.
टीम मॅक्स महाराष्ट्र | 25 Dec 2021 2:07 AM GMT
X
X
Updated : 25 Dec 2021 2:07 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire