Home > News Update > भाजपचे कपिल मिश्रा असू द्या किंवा कुणीही कारवाई हवीच- गंभीर

भाजपचे कपिल मिश्रा असू द्या किंवा कुणीही कारवाई हवीच- गंभीर

भाजपचे कपिल मिश्रा असू द्या किंवा कुणीही कारवाई हवीच- गंभीर
X

दिल्लीमधल्या काही भागात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराला ज्या व्यक्तींची प्रक्षोभक वक्तव्य जबाबदार आहेत, मग ते कोणत्याही पक्षाचे असो, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी परखड भूमिका भाजपचे खासदार गौतम गंभीर यांनी मांडली आहे. दिल्लीतील भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी दोन दिवसांपूर्वी सीएएच्या समर्थनार्थ एक रॅली काढली होती. या रॅलीत त्यांनी प्रक्षोभक भाषण करत पोलिसांनाही इशारा दिला होता. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत गौतम गंभीर यांनी कारवाईची मागणी केली आहे.

“दिल्लीत तणाव राहिला पाहिजे म्हणून यांनी रस्ते बंद केले, इथे दंगलीसारखं वातावरण यांनी तयार केले आहे. आमच्यातर्फे एकही दगड फेकण्यात आलेला नाही. (पोलिसांना उद्देशून) ट्रम्प जातात तोपर्यंत आम्ही शांततेनं राहू, पण त्यानंतर रस्ते मोकळे झाले नाहीतर आम्ही तुमचंही (पोलिसांचं) ऐकणार नाही. ज्यांनी आंदोलनाच्या नावाखाली रस्ता अडवून ठेवला आहे, त्यांना बाजूला करुन रस्ता सुरू करा नाहीतर डोनाल्ड ट्रम्प यांचा दौरा संपेपर्यंतच आम्ही थांबू, तोपर्यंत तुम्ही जाफराबाद आणि चांदबागचे रस्ते मोकळे करा ही विनंती”

कपिल मिश्रा यांच्या या वक्तव्यामुळे दिल्लीतले वातावरण तापले असा आरोप आता होऊ लागला आहे. यावर प्रतिक्रिया देताना खासदार गौतम गंभीर यांनी हिंसाचार करणारा कुणीही असो मग ते भाजपचे कपिल मिश्रा असले तरी कारवाई झालीच पाहिजे अशी भूमिका घेतली आहे. कपिल मिश्रा यांचे वक्तव्य असमर्थनीय आहे आणि हा कोणत्या पक्षाचा प्रश्न नाही तर दिल्लीचा प्रश्न आहे असंही गंभीर यांनी सुनावले आहे.

Updated : 25 Feb 2020 11:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top