Home > News Update > मोदीजी आमच्या लेकरांचं Vaccine परदेशात का पाठवलं?: आप

मोदीजी आमच्या लेकरांचं Vaccine परदेशात का पाठवलं?: आप

मोदीजी आमच्या लेकरांचं Vaccine परदेशात का पाठवलं?: आप
X

देशात कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या लसीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. याच दरम्यान भारत सरकारने आपल्या देशातून इतर देशांना लस पाठवल्याचं समोर आल्यानंतर मोदी सरकारवर टीका होत आहे. या दरम्यान दिल्लीत लसीकरण अभियानाबाबत 'मोदी, जी हमारे बच्चों की वॅक्सिन विदेश क्यों भेज दी...' असे पोस्टर लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लागलेल्या या पोस्टरनंतर दिल्ली पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे. यावर आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय रामकृष्ण शिंदे यांनी एक पत्रक सादर करत केंद्रसरकारला एक पत्र लिहून हिम्मत असेल तर आम्हाला अटक करा. असं चॅलेंज दिलं आहे.

काय म्हटलंय पत्रात...

पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप सरकारने फेब्रुवारी २०२० पासून आज पर्यंत कोविंड ची युद्धजन्य परिस्थिती कशा असंवेदनशील पद्धतीने हाताळली हे पूर्ण देश बघतोय. सर्वच पातळीवर आरोग्य व्यवस्थेची लक्तरे टांगली गेली आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा या सर्व परिस्थितीची दखल घेतली जात आहे.

दिल्ली राज्यातील ऑक्सिजन च्या गरजेपेक्षा सातत्याने फक्त ३५% ते ४०% ऑक्सिजनाचा पुरवठा करून केंद्राने मोठा दुजाभाव केल्याचे आपण बघितले. शेवटी मा. न्यायालयाने कानउघाडणी केल्यावर केंद्र सरकार ने गेल्या आठ दिवसांपासून ऑक्सिजनाचां पुरवठा सुरळीत केलाय.

आपले असंख्य बांधव ऑक्सीजन न मिळाल्यामुळे तडफडून मरण पावल्याची अत्यंत दुःखद वेळ आपल्या सर्वांवर आली आहे. ऑक्सिजन संदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदींना विचारलेल्या प्रश्न "ऑन एअर" आल्यामुळे ऑक्सिजन तुटावड्याचा अत्यंत गंभीर प्रश्न आणि केंद्राचा नाकर्तेपणा देशातील जनतेसमोर आला. यालाच तर गनिमीकावा म्हणतात. आज देशात प्रस्थापित विरोधी पक्ष अत्यंत कमजोर झाले असताना आरोग्य आणीबाणीच्या काळात रयतेच्या जगण्या मरण्याच्या

प्रश्नांना तोंड फोडून आप विरोधी पक्षाची पोकळी भरून काढतोय. वर्षभर कुठलेही आगावू नियोजन न करता व परिस्थितीकडे गांभीर्याने न पाहता जवळ जवळ ६.५० कोटी Vaccines ची निर्यात केली गेली. किती ही असंवेदनशीलता, मूर्खपणा आणि बेजबाबदारपणा !!! हे देश चालवत आहेत की चहाची टपरी?

१३५ कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात ते जर उपलब्ध असते तर लाखो नागरिकांचे प्राण वाचले असते. केंद्र सरकारच्या राक्षसी प्रवृत्तीमुळे जनता किड्या मुंगांसरखी मरते आहे हे खूपच वेदनादायक आहे. मोदींना या सगळ्या गोष्टींची जबाबदारी घ्यावीच लागेल. Vaccine खरेदीसाठी केंद्र सरकारने जर सर्व देशासाठी जागतिक पातळीवर निविदा काढून ते १३० कोटी जनतेसाठी खरेदी केले तर

हजारो कोटी रुपये वाचू शकतात हे गल्लीतल्या माणसाला सुद्धा समजते.विविध राज्य सरकारांना स्वतःच Vaccine ची सोय करायला सांगून मोदींनी हात झटकले तर आहेतच परंतु देशाच प्रचंड आर्थिक नुकसान करून देशाला वाऱ्यावर सोडले आहे.

मागच्या वर्षी केंद्राने रु. २० लाख कोटींचे जाहीर केलेले पॅकेज कुठेच दिसत नाही. चुकीच्या पद्धतीने तयार केलेल्या #PMCares च्या बद्दल न बोललेले बरे. या फंडातून अनुभव नसलेल्या गुजरातमधील कंपन्यांना व्हेंटिलेटर बनवण्याची कंत्राटे दिली गेली. दुर्दैवाने त्यांनी पुरवलेले अनेक व्हेंटिलेटर खराब आहेत त्यामुळे जनतेचा पैसा पाण्यात तर गेला आहेच पण असंख्य लोकांचे व्हेंटिलेटर अभावी सुद्धा मृत्यू झाले आहेत.

गेल्या ७ वर्षांत एकही पत्रकार परिषद न घेतलेल्या पंतप्रधान मोदींना जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत लागतील.

Vaccine न मिळाल्याने लाखो लोक मेली आहेत. केंद्र सरकारने Vaccine देण्याची सुरुवात १ मे पासून करण्याची मोठ्या थाटात घोषणा केली परंतु आज Vaccine उपलब्ध नसल्याने लासिकरणासाठी रांगेत उभे असलेल्या लाखो भारतीयांचा भ्रमनिरास झालाय. मोदींनी एकप्रकारे जनतेच्या भावनांशी खेळून खूप मोठा विश्वास घात केला आहे.

काल दिल्लीत काही ठिकाणी मोदींना पुढील प्रश्न विचारणारी पोस्टर्स लावण्यात आली आहेत.

"मोदीजी आमच्या लेकरांचं Vaccine परदेशात का पाठवलं?"

प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांचं मी मनापासून स्वागत करतो.

दुर्दैवाने अमित शहांच्या अखत्यारीतील दिल्ली पोलिसांनी पोस्टर्स लावणाऱ्या लोकांना अटक करून IPC सेक्शन १८८ आणि २६९ ही कठोर कलमे लावली आहेत.

आम्ही सर्वजण या नागरिकांसोबत आहोतच पण विविध समाज माध्यमांतून "मोदीजी आमच्या लेकरांचं Vaccine परदेशात का पाठवलं?" हा प्रश्न पंतप्रधान, आणि भाजपच्या सर्व नेत्यांना हा प्रश्न Vaccine मिळेपर्यंत विचारणाऱ आहोत. तो आमचा सनविधनिक अधिकार आहे.

हिंमत असेल तर करा आम्हाला अटक! असं चॅलेंज दिलं आहे.

Updated : 16 May 2021 10:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top