News Update
Home > News Update > Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव, 27 लोकांचा मृत्यू

Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव, 27 लोकांचा मृत्यू

पश्चिम दिल्लीत लागलेल्या आगीत 27 लोकांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव, 27 लोकांचा मृत्यू
X

दिल्लीत मुंडका भागात लागलेल्या आगीत 27 लोकांचा मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी झाले आहेत. मुंडका मेट्रो स्टेशन जवळ एका तीन मजली इमारतीमध्ये ही आग लागली होती. आगीत सर्वाधिक नुकसान दुसऱ्या मजल्यावर झालं असून दुसऱ्या मजल्यावरच अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आगीमध्ये मृत पावलेल्या लोकांबाबत दुःख व्यक्त केलं असून मृत व्यक्तीच्या परिवाराला 2 लाख रूपये तर जखमींना 50 हजार रूपये जाहीर केले आहेत.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील या घटनांबाबत दुःख व्यक्त केलं आहे.

सध्या आग आटोक्यात आली असून मृत व्यक्तींची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Updated : 14 May 2022 1:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top