Home > News Update > Bulli Bai Appप्रकरणी आरोपीला कोर्टाने जामीन नाकारला

Bulli Bai Appप्रकरणी आरोपीला कोर्टाने जामीन नाकारला

Bulli Bai Appप्रकरणी आरोपीला कोर्टाने जामीन नाकारला
X

Bulli Bai App प्रकरणी अटक करण्यात आलेल्या नीरज बिष्णोई याला दिल्ली कोर्टाने जामीन नाकारला आहे. इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असलेला नीरज बीष्णोई याने BullibaiApp तयार केले होते. त्याच्या जामीनावरील सुनावणी शुक्रवारी झाली. यावेळी कोर्टाने कडक शब्दात फटकारत त्याला जामीन नाकारला. विशिष्ट समाजाच्या महिलांच्या अस्मितेशी खेळत आणि सामाजिक तेढ वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नीरजाला जामिनावर सोडता येणार नाही, या शब्दात फटकारत कोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला.

सुमारे १०० मुस्लिम महिलांचे फोटो त्यांच्या परवानगीविना 'Bulli Bai' एपवर अपलोड करुन त्यांचा आभासी लिलाव करण्याचे अत्यंत हिन कृत्य नीरजने केले आहे. एवढेच नाही तर त्या महिलांच्या फोटोवर घाणेरड्या कॉमेंट्सही त्याने टाकल्या होत्या. पोलिसांनी नीरजच्या जामीनाला विरोध केला होता. देशातील विविध ठिकाणी नीरजविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत, त्यामुळे त्याच्या डीजिटल साधनांची तपासणी करत असल्याचे पोलिसांनी यावेळी कोर्टाला सांगितले.

यासंदर्भात एका महिला पत्रकाराने तक्रार केली आहे. काही प्रसिद्ध महिलांचे फोटो जाणूनबुजून घेण्यात आले आणि त्यांचा अपमान करण्यासाठी तसेच त्यांचा विनयभंग करण्यासाठी अश्लील कॉमेंट्सही करण्यात आल्याची तक्रार तिने केली होती. नीरजच्या या कृत्यामुळे आपली मानहानी असा आरोपही तिने केला आहे. याप्रकऱणात पोलिसांनी एक तरुणी आणि आणखी एका तरुणाला अटक केली आहे. त्या दोघांना सध्या १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Updated : 14 Jan 2022 2:39 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top