Home > Election 2020 > Delhi Assembly Election 2020 दिल्लीत मतदारांचा निरुत्साह...

Delhi Assembly Election 2020 दिल्लीत मतदारांचा निरुत्साह...

Delhi Assembly Election 2020 दिल्लीत मतदारांचा निरुत्साह...
X

भाजप,आप आणि काँग्रेस या तिरंगी पक्षासाठी दिल्ली विधानसभा निवडणुक महत्वपूर्ण आहे. दिल्लीत 70 जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान होणार असून मतमोजणी मंगळवारी 11 फेब्रुवारी रोजी होणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सूरवात झाली असून 1.47 करोड मतदार आपल्या मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सकाळी 9.51 वा. आई-वडिलांचे आशीर्वाद घेऊन केजरीवाल मतदानाला निघाले आहेत. 2015 च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला 67 जागा तर भाजपला फक्त 3 जागांवर विजय मिळवला होता यामध्ये काँग्रेस पक्षाने एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही.

भाजप,आप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत असून यामध्ये एकून 672 उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. दिल्लीत आतापर्यंत 4.33 % मतदान झालेलं आहे. दिल्लीत सर्वात चर्चेला गेलेला मुद्दा शाहीनबाग असून या ठिकाणी आजही CAA विरोधी आंदोलन सुरू आहे. आज सकाळपासूनच नागरिकांनी मोठ्या संख्येनी मतदानासाठी हजेरी लावली. यामध्ये सकाळी: 9.14 वा शाहीनबागमध्ये देखिल मोठी रांग दिसून आली. या निवडणुकीत आम आदमी पक्षाकडून अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आहेत. तर दुसरीकडे भाजपनं मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचं नाव जाहीर केलं नसून जनता दिल्लीच्या तक्तावर कोणाची वर्णी लागेल हे पाहण्यायोग्य ठरेल.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार दिल्लीत 1 वाजेपर्यंत फक्त 17.26 टक्के मतदान झालं आहे. सकाळ पासून दूपारी २ पर्यंत 28.14 टक्के मतदान दिल्लीत झालं आहे.

Updated : 8 Feb 2020 5:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top