Home > News Update > राज ठाकरे यांनी आजारी असल्याने आराम करावा, शिवसेनेचा खोचक टोला

राज ठाकरे यांनी आजारी असल्याने आराम करावा, शिवसेनेचा खोचक टोला

राज ठाकरे यांनी आजारी असल्याने आराम करावा, शिवसेनेचा खोचक टोला
X

राज ठाकरे यांनी आजारपणानंतर प्रथमच दिलेल्या मुलाखतीत उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. त्याला शिवसेनेही प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे यांनी झी २४ तासचे संपादक निलेश खरे यांना मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्रप्रेमामुळेच शिवसेना बुडाल्याची टीका केली. तसेच उध्दव ठाकरे हा विश्वास ठेवण्याजोगा माणून नाही, असाही घणाघात केला. त्याला शिवसेनेने उत्तर दिले आहे.

राज ठाकरे वेळ येईल तशी पलटी मारतात, हे संपुर्ण अयोध्यालाच नाही तर देशाला माहीत आहे. आजारी असल्याने आराम करावे आदरणीय उद्धव साहेब लवकरच तुम्हाला भेटायला येतील सतत आठवण काढु नये. असं म्हणत शिवसेनेच्या नेत्या अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

दिपाली सय्यद यांनी यापुर्वीही अनेक वेळा राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यातच अमित ठाकरे यांनी गृहमंत्री पदाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर दीपाली सय्यद यांनी खोचक टोला लगावला होता. त्यामुळे पुन्हा एकदा मनसे विरुध्द शिवसेना संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Updated : 24 July 2022 7:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top