Home > News Update > लॉकडाऊनबाबतच अंतिम निर्णय ११ एप्रिलला?

लॉकडाऊनबाबतच अंतिम निर्णय ११ एप्रिलला?

लॉकडाऊनबाबतच अंतिम निर्णय ११ एप्रिलला?
X

देशभरात रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी तर देशातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ५ हजार २७४ वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या १४९ झाली आहे. तर ४१० रुग्णांवर उपचार करुन त्यांना डिस्चार्ज करण्यात आला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारनं २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले असले तरी अजूनही कोरोनावर नियंत्रण मिळवणे कठीण जात आहे.

त्यामुळेच लॉकडाऊनचा कालावधी १४ एप्रिलनंतरही वाढवण्याची मागणी अनेक राज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. ११ एप्रिल रोजी नरेंद्र मोदी हे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर लॉकडाऊनचा कालावधीबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याबाबत ११ एप्रिलच्या बैठकीनंतर निर्णय़ होईल अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

कोणत्या राज्यात किती रुग्ण?

राज्य कोरोनाबाधीत रुग्ण मृत्यू

महाराष्ट्र ११३५ ७२

तामिळनाडू ६९० ७

दिल्ली ५७६ ९

तेलंगणा ४२७ ७

उत्तर प्रदेश ३४३ ३

केरळ ३३६ २

राजस्थान ३२८ ३

आंध्रप्रदेश ३०५ ४

मध्य प्रदेश २२९ १३

कर्नाटक १७५ ४

गुजरात १६५ १३

हरयाणा १४७ ३

जम्मू काश्मीर ११६ २

Updated : 9 April 2020 3:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top