लोणावळ्यात रेल रोको
X
Pune- डेक्कन क्वीन रेल्वे (deccan queen express) आंदोलनकर्त्या नागरिकांनी अडवली आहे. (Rail Roko At Lonavala) पुणे लोणावळा लोकल च्या फेऱ्या वाढवण्याची प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
पूर्वी लोकलच्या 48 फेऱ्या पुणे - लोणावळा ह्या मार्गावर होत्या. मात्र, कोरोना काळानंतर या फेऱ्यांमध्ये घट करण्यात आली. पुन्हा पूर्ववत करण्याकरिता पुणे - लोणावळा लोकल फेऱ्या वाढवाव्या. बहुतांश रेल्वे गाड्यांचे थांबे हे लोणावळ्यामध्ये पूर्वी होते. जे थांबे मध्यंतरीच्या काळात बंद केले आहेत. ते पुन्हा पूर्वरत प्रमाणे चालू करावे. अशी मागणी आंदोलकांची केली आहे.
कोरोना काळात अनेक रेल्वे गाड्या या कमी करण्यात आल्या होत्या. त्यांचा थांबा लोणावळ्यामध्ये पूर्वी होता. मात्र, करोना काळात हा थांबा बंद करण्यात आला. पुन्हा हा थांबा चालू करण्या संदर्भात स्थानिकांनी रेल रोको आंदोलन चालू केले आहे. या आंदोलनामुळे रेल्वेचे वेळापत्रक काहीशी बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.






