Home > News Update > डेक्कन क्वीन 93 वर्षांची झाली

डेक्कन क्वीन 93 वर्षांची झाली

डेक्कन क्वीन 93 वर्षांची झाली
X

मध्य रेल्वे अंतर्गत येणाऱ्या (central railway) मुंबई ते पुणे या दोन शहरा दरम्यान धावणाऱ्या 'डेक्कन क्वीन' रेल्वेला आज 93 वर्षे पूर्ण झालेले आहेत. 'दख्खनची राणी' म्हणून देखील या रेल्वेची ओळख आहे.

भारतातली पहिली डिलक्स ट्रेन असलेली डेक्कन क्वीन आज 93 वर्षांची झालीये. दररोज पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी डेक्कन क्वीन नेहमीच सारथी ठरते. आज याच डेक्कन क्वीनचा 93 वा वाढदिवस आहे. पुणे रेल्वे स्थानकात आज या डेक्कन क्वीनचा वाढदिवस सोहळा पार पडला आहे.





डेक्कन क्वीन (दख्खन की रानी) चा इतिहास :

अक्षरशः दोन शहरांची कहाणी आहे. डेक्कन क्वीनच्या वेळेवर निघून वेळेवर पोहोचण्याच्या अचूक रेकॉर्डमुळे दोन्ही शहरांतील प्रवासी आनंदी आहे. गेल्या 92 वर्षांच्या कार्यकिर्दीत डेक्कन क्वीन ने दोन शहरांमधील प्रवाशांना एकत्र आणण्याचे काम केलेले आहे.

1 जून 1930 रोजी महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहरांमध्ये ‘डेक्कन क्वीन’ ची सुरुवात हा मध्य रेल्वेचा अग्रदूत असलेल्या ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा होता. या प्रदेशातील 2 महत्त्वाच्या शहरांना सेवा देण्यासाठी रेल्वेवर दाखल करण्यात आलेली ही पहिली डिलक्स ट्रेन होती आणि तिला पुण्याचे नाव देण्यात आले होते, ज्याला ‘दख्खनची राणी’ (‘दख्खन की रानी’) असेही म्हटले जाते.

सुरुवातीला, ही ट्रेन प्रत्येकी 7 डब्यांच्या 2 रेकसह सादर करण्यात आली होती, ज्यापैकी एक स्कार्लेट मोल्डिंगसह चंदेरी आणि दुसरी सोनेरी रेषांसह रॉयल ब्लू रंगाने रंगवलेला होता. मूळ रेकच्या डब्यांच्या अंडर फ्रेम्स इंग्लंडमध्ये बांधण्यात आल्या होत्या तर कोचच्या बॉडी जीआयपी रेल्वेच्या माटुंगा वर्कशॉपमध्ये बांधण्यात आल्या होत्या.

डेक्कन क्वीनमध्ये सुरुवातीला फक्त प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणीची सोय होती. 1 जानेवारी 1949 रोजी प्रथम श्रेणी रद्द करण्यात आली आणि द्वितीय श्रेणीची प्रथम श्रेणी म्हणून पुनर्रचना करण्यात आली, जी जून 1955 पर्यंत चालू राहिली जेव्हा या ट्रेनमध्ये प्रथमच तृतीय श्रेणी सुरू करण्यात आली. हे नंतर एप्रिल 1974 पासून द्वितीय श्रेणी म्हणून पुन्हा नियुक्त केले गेले. मूळ रेकचे डबे 1966 मध्ये इंटिग्रल कोच फॅक्टरी, पेरांबूर येथे बांधलेले अँटी-टेलिस्कोपिक स्टील बॉडीच्या इंटिग्रल कोचेस मध्ये बदलण्यात आले. या डब्यांमध्ये उत्तम आरामदायी प्रवासासाठी बोगींचे सुधारित डिझाइन आणि आतील सजावट आणि फिटिंग्जमध्ये सुधारणा समाविष्ट केल्या आहेत. अधिक क्षमता वाढविण्यासाठी रेकमधील डब्यांची संख्या देखील मूळ 7 डब्यांवरून वाढवून 12 करण्यात आली होती. कालांतराने ट्रेनमधील डब्यांची संख्या सध्याच्या 17 डब्यांच्या पातळीपर्यंत वाढवण्यात आली आहे.





सुरुवातीपासूनच, प्रवाशांना उच्च दर्जाच्या आरामदायी सुविधा पुरवण्याव्यतिरिक्त, ट्रेनमध्ये भारतात प्रथमच रोलर बेअरिंग असलेल्या डब्यांची सुरुवात, एंड ऑन जनरेशन कोचेस 110 व्होल्ट प्रणालीसह सेल्फ जनरेटिंग कोचेसमध्ये बदलणे, प्रवाशांना वाढीव क्षमता प्रदान करीत प्रथम आणि द्वितीय श्रेणीच्या चेअरकारला सुरुवात यासारख्या विविध सुधारणा करण्यात आल्या आहेत. या ट्रेनसाठी रंगसंगती म्हणून खिडकीच्या पातळीच्या वर असलेल्या लाल पट्ट्या सह क्रीम आणि ऑक्सफर्ड निळ्या रंगाची विशिष्ट रंगसंगती स्वीकारण्यात आली.

खालील विशेष वैशिष्ट्यांसह रेक 1995 मध्ये बदलण्यात आले :

सर्व नवीन उत्पादित किंवा सुमारे एक वर्ष जुने, एअर ब्रेक कोच.

जुन्या रेकमधील 5 फर्स्ट क्लास चेअर कारच्या जागी 5 एसी चेअर कारमध्ये बदल करण्यात आलं, ज्यामुळे धूळमुक्त वातावरणात 65 अतिरिक्त आसन क्षमता प्रदान. तसेच 9 - द्वितीय श्रेणीच्या चेअर कार जुन्या डब्यांच्या तुलनेत 120 आसनांची अतिरिक्त आसन क्षमता प्रदान. अशा प्रकारे, जुन्या रेकमध्ये 1232 जागांच्या तुलनेत नवीन रेकमध्ये एकूण 1417 आसनक्षमता प्रदान केली आहे, म्हणजेच 15% ने वाढ झाली आहे.

डायनिंग कार 32 प्रवाशांसाठी टेबल सेवा देते आणि मायक्रोवेव्ह ओव्हन, डीप फ्रीझर आणि टोस्टर यांसारख्या आधुनिक पॅन्ट्री सुविधा आहेत. डायनिंग कार देखील कुशनच्या खुर्च्या आणि कार्पेटने सुसज्ज आहे.






Updated : 1 Jun 2023 9:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top