Home > News Update > धक्कादायक दीड महिन्यापासून मृतदेह अंत्यसंस्काराविना

धक्कादायक दीड महिन्यापासून मृतदेह अंत्यसंस्काराविना

धक्कादायक दीड महिन्यापासून मृतदेह अंत्यसंस्काराविना
X

राज्यात आदिवासी बांधवांवरील अत्याचाराच्या अनेक घटना सातत्याने समोर येत असतात. पण आता नंदुरबार जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आली आहे. बलात्कार करून मुलीची हत्या करण्य़ात आली तरी पोलिसांनी आत्महत्येची नोंद केल्याचा आरोप करीत मृत मुलीच्या वडिलांनी केला आहे. एवढेच नाही तर मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता तिच्या कुटुंबियांनी मृतदेह गेल्या जवळपास पावणे दोन महिन्यांपासून मिठाच्या खड्डय़ात पुरून ठेवला आहे.


प्रकरण नेमके काय आहे?

"आपल्या मुलीच्या मृतदेहाचे पुन्हा पोस्टमॉर्टेम करावे आणि या गुन्हेगारांना शोधून त्यांच्यावर कारवाई करावी" अशी मागणी तिच्या वडिलांनी केली आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या धडगाव तालुक्यातील वावी या गावात ही घडली आहे. पीडित महिला ही आपल्या माहेरी आली होती, तेव्हाच १ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. तिच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपानुसार वावी गावातील तिच्या ओळखीच्या रणजीत ठाकरे आणि आणखी एकाने तिला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून गावाबाहेर नेले. त्यानंतर थोड्या वेळातच त्या पीडित महिलेने आपल्या नातेवाईकांशी मोबाइलवरुन संपर्क केला आणि आपल्यावर रणजीत ठाकरेसह चार जण जबरदस्ती करत आहेत, अशी माहिती दिल्याचे तिच्या कुटुंबियांनी सांगितले.





पुरावे नष्ट केले गेले?

ते लोक आपल्याला ठार मारतील, अशी भीतीही तिने त्याचवेळी व्यक्त केली होती, अशीही माहिती तिच्या वडिलांनी दिली आहे. पण त्यानंतर तिचा फोन बंद झाला आणि काही वेळानंतर वावी येथील एका झाडाला तिचा गळफास लावलेला मृतदेह सापडल्याचे तिच्या कुटुंबियांना कळवण्यात आले. पण कुटुंबिय घटनास्थळी पोहोचण्याआधीच तिचा मृतदेह झाडावरून उतरवून पुरावा नष्ट करण्यात आला असा आरोपर मृत महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे.

पीडितेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची तक्रार आम्ही केली होती, पण पोलिसांनी तशी तक्रार घेतली नाही आणि तपासही तसा केला नाही, असा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे, यामुळे तिचा मृतदेह ताब्यात घेतला तरी आम्ही आतापर्यंत त्यावर अंत्यसंस्कार केलेले नाहीत आणि पुन्हा पोस्टमॉर्टेम होईल, या अपेक्षेने तिचा मृतदेह मिठाच्या खड्डय़ात ठेवण्यात आला आहे, , असे पीडितेच्या वडिलांनी सांगितले.

आतापर्यंत काय कारवाई झाली?

याप्रकरणी आतापर्यंत तीन आरोपींना पोलिसांनी अठक केली आहे. पण ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान पोलिसांनी मृतदेहाचे पुन्हा पोस्टमॉर्टेम करण्याची परवानगी दिली आहे. पण ते धडगावला करु नये कारण आधीचे पोस्टमॉर्टेम तिथेच झाले होते, अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे. तसेच मृतदेह मुंबईला नेऊन किंवा मुंबईच्या तज्ज्ञांकडून पोस्टमॉर्टेम करण्याची मागणी तिच्या वडिलांनी केली आहे.

Updated : 14 Sep 2022 3:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top