बिहारच्या बक्सर नंतर उत्तर प्रदेशमध्ये नदीमध्ये आढळले मृतदेह
X
बिहारच्या बक्सर जिल्ह्यामध्ये नदीत लोकांचे मृतदेह आढळल्यानंतर आता उत्तर प्रदेशच्या गाजीपूर मध्ये गंगा नदीत मृतदेह आढळल्याचं समोर आलं आहे. मंगळवारी गाजीपूर येथे गंगा नदीच्या पाण्यात काही मृतदेह दिसल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
गाजीपूर आणि बक्सर मध्ये सुमारे 55 किलोमीटरचं अंतर आहे. बिहारच्या बक्सर जिल्ह्यामध्ये सोमवारी डझनभर मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळले होते. हे मृतदेह आढळल्यानंतर बिहारच्या अधिकाऱ्यांनी हे मृतदेह उत्तर प्रदेशमधून वाहून आल्याचा तर्क लावला होता. तसंच अधिकाऱ्यांच्या मते बिहारमध्ये मृतदेहांना पाण्यात टाकण्याची परंपरा नाही.
दरम्यान उत्तर भारतामध्ये ज्या प्रमाणे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्याचा विचार करता हे मृतदेह कोरोना संक्रमीत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात वेगवगळे तर्क लावले जात आहेत. ग्रामीण भागात रुग्णांच्या नातेवाईकांनी भीतीमुळे मृतदेह नदीत फेकून दिल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच गावामध्ये कोव्हिड रुग्णांच्या अंतिम संस्काराच्या नियमांचं पालन करता येत नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं हे मृतदेह नदीत फेकून दिले असतील याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही.
मृतदेह पाण्यात आढळल्यानं हे दूषीत पाणी लोकांच्या शरीरात गेल्यास रोगराई मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच अधिकारी मृतदेह कुठून आले याची चौकशी करत आहे. त्यातच स्थानिक लोक प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप लावत आहे. या संदर्भात NDTV ने वृत्त दिलं आहे.