Home > News Update > #अजितदादा कोविड पॉझिटीव्ह : ट्विट करुन दिली माहीती

#अजितदादा कोविड पॉझिटीव्ह : ट्विट करुन दिली माहीती

#अजितदादा कोविड पॉझिटीव्ह : ट्विट करुन दिली माहीती
X

राज्याच्या अस्थिर राजकीय परीस्थितीच्या पार्श्वभुमीवर राजकीय नाट्य गुवाहटी ते सर्वोच्च न्यायालय व्हाया मुंबई सुरु असताना राज्याचे उपमु्ख्यमंत्री अजित पवार कोविड पॉझिटीव्ह झाले आहे. अजित पवारांनी स्वतः ट्विट करुन ही माहीती दिली आहे.

विधानपरीषद निवडणुक निकालानंतर शिवसेनेअंतर्गत उफाळलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालं आहे. आरोप प्रत्यारोपाच्या लढाईत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शिवसेना आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी आज बंडखोर मंत्र्याची खाती काढून घेतली आहेत.

त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोविड झाला आहे. ते म्हणाले, काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.

Updated : 27 Jun 2022 10:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top