Home > News Update > पुण्यात वीकेण्डला कोरोना निर्बंध, नागरिकांनी पर्यटनस्थळी न जाण्याचे अजित पवारांचे आवाहन

पुण्यात वीकेण्डला कोरोना निर्बंध, नागरिकांनी पर्यटनस्थळी न जाण्याचे अजित पवारांचे आवाहन

पुण्यात वीकेण्डला कोरोना निर्बंध, नागरिकांनी पर्यटनस्थळी न जाण्याचे अजित पवारांचे आवाहन
X

राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागल्याने अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. पुण्यातही निर्बंध शिथिल करण्यात आले होते. पण आता पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा पुण्यात काही निर्बंधांची घोषणा केली आहे. पुण्यातील दुकाने शनिवार, रविवार बंदच राहणार आहेत. पण अत्यावश्यक सेवेंतर्गत येणारी दुकाने सुरू राहणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. वीकेंडला नागरिक गर्दी करत आहेत, राज्याबाहेर प्रवास करत आहेत, ट्रेकिंगला जाताहेत त्यामुळे हे नियम लागू केल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे.

बाहेर जाऊन आलेल्या लोकांना 15 दिवस कोरंटाईन करावे लागेल, असा इशाराही अजित पवार यांनी दिला आहे.

नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, पर्यटन स्थळी जाऊ नये, असे आवाहनही अजित पवार यांनी दिला आहे.

तसेच दिलेल्या परवानगीपेक्षा जास्त लोकांना एकत्रित येता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान विजय वडेट्टीवार यांनी लोणावळ्यात 300 जणांची ओबीसी आरक्षणावर बैठक बोलावल्याने अजित पवार यांना विचारण्यात आले तेव्हा असे असेल तर मी त्यांच्याशी बोलेन, असे त्यांनी स्पष्ट केले.

Updated : 19 Jun 2021 9:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top