सासूला निर्दयीपणे मारहाण करणाऱ्या सुनेचं कृत्य CCTV मध्ये कैद
सासू आणि सूनेमध्ये शाब्दिक खटके उडत असतात. मात्र, आता या घटनांमध्ये वाढ होत त्याच रूपांतर मारहाणीमध्ये होत असल्याचं दिसतंय. सासूला निर्दयीपणे मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.
 आनंद गायकवाड |  9 Oct 2023 9:19 PM IST
 X
X
X
सासू आणि सूनेमध्ये शाब्दिक खटके उडत असतात. मात्र, आता या घटनांमध्ये वाढ होत त्याच रूपांतर मारहाणीमध्ये होत असल्याचं दिसतंय. कौटुंबिक वादातून एका सुनेनं आपल्या सासूला निर्दयीपणे मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.
ठाणे पूर्व इथल्या कोपरी, सिद्धार्थनगरमधील ही घटना आहे. विशेष म्हणजे ही घटना घडतांना त्याठिकाणी आणखी एक महिला स्वयंपाकगृहात उपस्थित होती. मात्र, तिनंही या घटनेत हस्तक्षेप केला नाही. या घटनेतील पीडित सासू एका खासगी विमा कंपनीत नोकरी करत असल्याची माहिती समोर आलीय. या मारहाणीचं सीसीटिव्ही फुटेज व्हायरल झालंय. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणाची दखल घेतली आहे. मात्र, याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही.
या सीसीटिव्ही फुटेजमध्ये सुनेनं सासूसोबत नुसतं गैरवर्तनच केलेलं नाही तर तिला बेडवरून खाली जमिनीवर लोटलं, मारहाण केली आहे.
 Updated : 9 Oct 2023 9:19 PM IST
Tags:          Thane   Thane News   Thane Purv   Thane Sidharth Nagar Kopari News   Daughter-in-law brutally beating mother-in-law   caught on CCTV Thane   Thane Kopri News   Today News Thane   Thne Kopri News Thane   thane latest news marathi   Thane police   Thane TMC   
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire
















