Home > News Update > डेल्टा, ओमायक्रॉन पाठोपाठ Delmicronचा धोका...जगावर भीतीचे सावट

डेल्टा, ओमायक्रॉन पाठोपाठ Delmicronचा धोका...जगावर भीतीचे सावट

ओमायक्रॉन या व्हेरियंटला एक महिना उलटून गेल्यानंतरही अजून या व्हेरिएन्टच्या संसर्गाची तीव्रता समजू शकलेली नाही. त्यावरील उपचार पध्दती आणि धोका यावर तज्ज्ञांचे संशोधन सुरूच आहे. त्यातच पाश्चिमात्य देशातील कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येवरून डेलमीक्रॉन हा नवा शब्द चर्चेत आला आहे.

डेल्टा, ओमायक्रॉन पाठोपाठ Delmicronचा धोका...जगावर भीतीचे सावट
X

मुंबई - दक्षिण आफ्रिकेतून जगभर पसरलेल्या ओमायक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने कहर माजवला आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. पण ओमायक्रॉन या व्हेरियंटला एक महिना उलटून गेल्यानंतरही अजून या व्हेरिएन्टच्या संसर्गाची तीव्रता समजू शकलेली नाही. त्यावरील उपचार पध्दती आणि धोका यावर तज्ज्ञांचे संशोधन सुरूच आहे. त्यातच पाश्चिमात्य देशातील कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येवरून डेलमीक्रॉन (Delmicron) हा नवा शब्द चर्चेत आला आहे.

काय आहे डेलमीक्रॉन? (What is Delmicron)

तज्ज्ञांच्या मतानुसार डेल्टा (Delta Varient) किंवा ओमायक्रॉन (Omicron Varient) हे कोरोनाचे शेवटचे व्हेरियंट नाहीत. त्यामुळे भविष्यात यासारखे अनेक नवे व्हेरियंट निर्माण होऊ शकतात. त्यामुळे डेल्टा आणि ओमिक्रॉन यांच्या संयुक्त व्हेरियंटमधून डेलमीक्रॉन या व्हेरियंटची निर्मीती झाल्याचा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार पाश्चिमात्य देशात डेलमीक्रॉनची त्सुनामीसारखी लाट आलेली आहे. तर डेलमीक्रॉन हा नवा व्हेरियंट नसुन डेल्टा आणि ओमिक्रॉनचं एकत्रित मिळून नवं रूप आहे, असे म्हटले आहे. तर या डेलमीक्रॉनचा भारतासह अनेक देशांना फटका बसण्याची शक्यता रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आली आहे.

आतापर्यंत तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार डेल्मीक्रॉन हा कोरोनाचा नवा व्हेरियंट आहे का? याबाबत स्पष्टता आलेली नाही. तर दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या ओमायक्रॉननंतर आतापर्यंत कोरोनाच्या SARS-CoV-2 कोणत्याही व्हेरियंटची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र नोव्हेंबर 2021 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ओमिक्रॉन या कोरोनाच्या व्हेरियंटची अधिकृत घोषणा केली होती. त्यामुळे काही तज्ञांच्या मतानुसार हा नवा व्हेरियंट नसून तो डेल्टा आणि ओमिक्रॉन या दोन व्हेरियंटचा संयोग असु शकतो. त्यामुळे जर या दोन व्हेरियंटचा संयोग असेल तर त्यातून विषाणू पसरण्याचा वेग जास्त असू शकतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. Omicron SARS-CoV-2 चे B.1.1.1.529 हा दक्षिण आफ्रिकेत मिळालेला व्हेरियंट आहे. हा डेल्टापेक्षा सौम्य लक्षणे असलेला व्हेरियंट आहे. मात्र याचा प्रसार वेग जास्त आहे. मात्र ओमायक्रॉनमध्ये डेल्टाच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण अत्यल्प असल्याचे समोर आले आहे. तसेच या नव्या डेल्मीक्रॉन संदर्भात जागतिक आरोग्य संघटना, अमेरीकेची सेंटर फॉर डिसीज कंट्रोल व भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषद (ICMR) ने डेलमीक्रॉन संदर्भात कुठलेही भाष्य केलेले नाही.

Updated : 24 Dec 2021 3:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top