Home > News Update > आदिवासी समाजातील वृद्घ महिलेचे घर जमिनदोस्त ; न्यायासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

आदिवासी समाजातील वृद्घ महिलेचे घर जमिनदोस्त ; न्यायासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

आदिवासी समाजातील वृद्घ महिलेचे घर जमिनदोस्त ; न्यायासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
X

यवतमाळ : कळंब तालुक्यातील जोडमोहा येथे वास्तव्यास असलेल्या आदिवासी समाजातील वृद्घ महिलेचे घर जमिनदोस्त करण्यात आले. त्या महिलेला न्याय देण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी धडक देत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन दिले. पार्वता चंद्रभान मराठे (वय 70) या महिलेचे पन्नास वर्षापासून जोडमोहा येथे वास्तव्य आहे. गावातील काही समाजकंटक घरी आले. त्यांनी शिवीगाळ केली.

तसेच ग्रामपंचायतकडून कोणतीही पूर्वसूचना न देता सरपंचाच्या पतीसह इतर काही जणांनी घर जमिनदोस्त करून टिनपत्रे काढून फेकली.असा आरोप करण्यात आला. या संदर्भात यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, कोणतीही कारवाई झाली नाही, असा आरोपही निवेदनातून करण्यात आला. दोषींवर कारवाई करून महिलेला घर बांधून देण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय कोलाम समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

Updated : 16 Nov 2021 12:22 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top