Home > News Update > Zomato डिलीव्हरी बॉय दलित असल्याने मारहाण, ग्राहकाचा जेवण घेण्यास नकार

Zomato डिलीव्हरी बॉय दलित असल्याने मारहाण, ग्राहकाचा जेवण घेण्यास नकार

Zomato डिलीव्हरी बॉय दलित असल्याने मारहाण, ग्राहकाचा जेवण घेण्यास नकार
X

भारताला पुरोगामित्वाची परंपरा असल्याच्य़ा कितीही बाता मारल्या गेल्या तरी अजूनही दलितांवर अन्यायाचे प्रकार घडत आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशातही (Uttra Pradesh) असाच धक्कादायक प्रकार घडला आहे. Zomatoवर बुक करण्यात आलेल्या जेवणाच्या ऑर्डरचे (order )पार्सल (parcel )घेऊन गेलेल्या दलित डिलीवरी बॉयकडून जेवण घेण्यास ग्राहकाने नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार लखनऊमध्ये (Lucknow) घडला आहे. एवढेच नाही तर त्याला मारहाण करत त्यांच्या तोंडावर थुंकण्यात आल्याचाही आरोप झाला आहे.

शनिवारी रात्री लखनऊमध्ये हा प्रकार घडला. Zomato डिलिव्हरी बॉय (Delivery Boy ) दलित असल्याने ग्राहकाने जेवण घेण्यास नकार दिला, तसेच त्याला मारहाण करण्यात आली एवढेच नाही तर त्याच्या तोंडावर थुंकण्यात आले असाही आरोप झाला आहे. या प्रकरणमुले देशभरातून खळबळ उडाली आहे. पीडित मुलाच्या तक्रारीवर पोलिसांनी एकूण १४ जणांविरोधात विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पण पोलिसांनी तोंडावर थुंकल्याचा आणि दलित असल्याने शिविगाळ केल्याचा हा प्रकार नसून हे प्रकरण फक्त मारहाणीचा आहे, असा दावा केला आहे.

नेमकं काय घडलं?

लखनऊच्या आशियाना परिसरात विनीत रावत हा Zomato डिलिव्हरीचे काम करतो. शनिवारी रात्री त्याला कंपनीने अजय सिंग (Ajay singh) नावाच्या ग्राहकाकडे डिलिव्हरी देण्यासाठी पाठवलं. विनीतच्या म्हणण्यानुसार त्याने अजय सिंह यांना आपले नाव सांगताच ते भडकले आणि त्यांनी आपल्याला शिवीगाळ केली. "तुम्ही शिवलेलं सामान आम्ही घेणार का असे ते म्हणले" असा आरोप विनितने केला आहे. यावर आपण जेवण घ्यायचं नसेल तर ऑर्डर रद्द करा पण शिव्या देऊ नका, असे सांगितले, असे विनितचे म्हणणे आहे.

यानंतर संतापलेल्या अजय सिंग यांनी त्याच्या हातातील जेवणाचे पास्रल फेकून दिले आणि त्याच्या तोंडावर ते थुंकले, असा आरोप विनितने केला आहे. याला विरोध करताच अजय आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांनी काठीने मारहाण केली, असा आरोप विनितने केला आहे.

पोलिसांचे म्हणणे काय?

इथले पोलीस अधिकारी दीपक पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "अजय सिंह घरातून त्यांच्या मित्राला सोडण्यासाठी निघाले होते, तेव्हाच विनीत यांनी त्यांना पत्ता विचारला. अजय पान खात होते आणि विनीतला पत्ता सांगण्यासाठी त्यांनी त्यांच्या तोंडातील पानमसाला थुंकला तेव्हा काहीसा फवारा विनीत वर उडाला. यावर विनीतने शिवी देत वादाला सुरुवात केली आणि म्हणून अजय आणि त्याच्या घरच्यांनी विनीतला मारहाण केली" अशी बाजू आरोपी अजय सिंग यांनी मांडली आहे.

उर्मिला मातोंडकर यांची कारवाईची मागणी

अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी देखील ट्विट करत या घटनेबद्दल निषेध नोंदवला आहे आणि संबंधित आरोपींवर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी ट्विट करुन आपली संताप व्यक्त केला आहे, "खूपच लज्जास्पद आणि वेदनादायक....आपल्या देशाची सर्वात मोठी कमतरता आणि आव्हान म्हणजे जातिवाद वर्षानुवर्षे प्रयत्न करूनही आपण ते नष्ट करू शकलो नाही तर दुसरं काय साध्य होणार? देशाला अधोगतीकडे नेणाऱ्या अशा लोकांवर कठोर कारवाई व्हायला हवी", असं म्हणत त्यांनी या घटनेतील आरोपींवर कारवाईची मागणी केली आहे.

Updated : 20 Jun 2022 2:23 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top