Home > News Update > अहमदनगर: दलित सरपंचाच्या गळ्यात घातला चपलेचा हार

अहमदनगर: दलित सरपंचाच्या गळ्यात घातला चपलेचा हार

अहमदनगर: दलित सरपंचाच्या गळ्यात घातला चपलेचा हार
X

संगमनेर तालुक्यातील कसारे गावच्या सरपंचांना चक्क चपलेचा हार घालून त्यांचा पाणउतारा करन्यात आला आहे.या घटनेने अहमदनगर जिल्हात ऐकच खळबळ उडालेली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील कसारे गावात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गावच्या दलित सरपंचाला गावातील समाजकंटकांनी चपलेचा हार घातल्याचा गावच्या सरपंचाने केला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या आरक्षण सोडतीमध्ये सरपंचपद अनुसूचित जातीजमातीसाठी राखीव ठेवले गेले होते. यात महेश अण्णासाहेब बोराडे हे या समाजातून येत असल्याने त्यांच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडली. याच राग मनात धरुन या नवनिर्वाचित सरपंचाला चपलेचा हार घातल्याचा आरोप या सरपंचाने केला आहे.

या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

या संदर्भात ३(१)(D) अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जमातीच्या व्यक्तीच्या गळ्यात पादत्रानांची माळ घालणे आणि ३(१)(w)(१) अनुसूचित जातीच्या किंवा अनुसूचित जमातीच्या स्त्रीला ती अनुसूचित जाती किंवा जमातीची आहे. याची माहिती असताना तिला जाणूनबुजून तिची संमती नसताना स्पर्श करणे.

या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपींनी देखील सरपंचावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

Updated : 31 Oct 2021 1:04 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top