Home > News Update > दहीहंडीचा क्रीडा प्रकारात समावेश, आयोजक खूश

दहीहंडीचा क्रीडा प्रकारात समावेश, आयोजक खूश

दहीहंडीचा क्रीडा प्रकारात समावेश, आयोजक खूश
X

दहीहंडी उत्सवाचा क्रीडा प्रकारात समावेश करण्यात आला आहे. पुढच्या वर्षीपासून हा निर्णय लागू होणार आहे. पण या निर्णयामुळे दहीहंडी उत्सव आयोजित कऱणाऱ्यांमध्ये आणि गोविंदांमध्ये आनंद व्यक्त होतो आहे. कोरोनानंतर तब्बल दोन वर्षानंतर दहीहंडी उत्सव साजरा होत आहे. पूर्वीच्या दहीहंडी उत्सवापेक्षा यंदाच्या दहीहंडी उत्सवाला वेगळे स्वरूप प्राप्त होईल, असा विश्वास दहीहंडी मंडळांनी व्यक्त केला आहे. दहीहंडी उत्सव हा शारीरिक व्यायाम असल्यामुळे कुस्ती प्रमाणेच त्याला दर्जा मिळाला असल्याने मनसे कार्यकर्ते कर्ण बाळा दुनबळे यांनी सरकारचे आभार मानले आहेत.

Updated : 18 Aug 2022 1:59 PM GMT
Next Story
Share it
Top