Home > News Update > दाभोळकर खून खटला, तपास बंद करण्याच्या भूमिकेवर CBI ला सुप्रीम कोर्टाची नोटीस

दाभोळकर खून खटला, तपास बंद करण्याच्या भूमिकेवर CBI ला सुप्रीम कोर्टाची नोटीस

दाभोळकर खुन खटल्यातील मुख्य सूत्रधारांना जेरबंद करण्याअगोदरच CBI ने तपास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेवर सुनावणी घेत सुप्रीम कोर्टाने CBI ला नोटीस बजावली आहे.

दाभोळकर खून खटला, तपास बंद करण्याच्या भूमिकेवर CBI ला सुप्रीम कोर्टाची नोटीस
X

डॉ. नरेंद्र दाभोळकर( dr narendra dabholakar) यांच्या खून खटल्यात संशयित मारेकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. परंतु या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधाराला पकडण्याअगोदरच हा तपास बंद करण्यासंबंधी एक अहवाल सीबीआयने(CBI) कोर्टाला दिला आहे. हा खटला उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरु होता. पण उच्च न्यायालयाने देखील ही देखरेख थांबवली आहे. यासंदर्भात मुक्ता आणि हमीद दाभोळकर यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती अहसुंदिन अमनउल्लाह यांच्या समोर झालेल्या सुनावणीत अॅड आनंद ग्रोव्हर आणि अॅड किशन कुमार यांनी अॅड अभय नेवागी यांच्या मार्फत तयार केलेल्या याचिकेवर बाजू मांडली.

काय आहेत याचिकेतील मुद्दे

नरेंद्र दाभोळकर खून खटल्यात संशयित आरोपींवर पुणे कोर्टात सुनावणी सुरु असून ही याचिका मुख्य सूत्रधाराला पकडण्याविषयी आहे.

डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश, प्रा. कलबुर्गी यांचे खून व्यापक कटाचा भाग

या खुनातील सूत्रधार फरार असेपर्यंत विवेकवादी विचारवंताच्या जीवाला धोका कायम

न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने सीबीआय ला त्यांचा तपास बंद करण्याच्या भूमिकेविषयी नोटीस बजावली आहे.

Updated : 18 May 2023 2:43 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top