Home > News Update > गुजरातमध्ये कोरोना संक्रमणाची भीती, अहमदाबामध्ये 4 दिवसांचा कर्फ्यू

गुजरातमध्ये कोरोना संक्रमणाची भीती, अहमदाबामध्ये 4 दिवसांचा कर्फ्यू

गुजरातमध्ये कोरोना संक्रमणाची भीती, अहमदाबामध्ये 4 दिवसांचा कर्फ्यू
X

दिवाळी संपताच गुजरातमध्ये कोरोनाचे संक्रमण वाढण्याची भीती असल्याने शुक्रवारपासून अहमदाबादमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. 20 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबरच्या सकाळी 6 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू असणार आहे. त्यानंतर 23 नोव्हेंबरपासून रात्रीच्या वेळी कर्फ्यू कायम राहणार आहे. गुजरातचे मुख्य सचिव राजीव कुमार गुप्ता यांनी ही माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसात अहमदाबादमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.

खासगी हॉस्पिटलमध्ये मोठ्या संख्येने कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. सरकारी हॉस्पिटल्सच्या तुलनेत खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यास रुग्ण प्राधान्य देत आहेत. शहरातील खासगी हॉस्पिटलमधलेय 400 बेड सध्या फक्त रिकामे आहेत. तर सरकारी हॉस्पिटलमधील 2600 बेड सध्या रिकामे आहेत.

दरम्यान कर्फ्यूच्या काळात शहरातील दूध विक्रीची दुकाने आणि मेडिकल सुरू राहणार आहेत. दिवाळीनंतर शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहेत. दरम्यान गुजरातमध्येही 23 नोव्हेंबरपासून शाळा आणि कॉलेजेस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Updated : 21 Nov 2020 3:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top