Home > News Update > रोजगार मेळाव्यात 'बेरोजगारां'ची गर्दी

रोजगार मेळाव्यात 'बेरोजगारां'ची गर्दी

रोजगार मेळाव्यात बेरोजगारांची गर्दी
X

आधीच देशात बेरोजगारी असतांना कोरोनाच्या प्रादुर्भाव नंतर यात आणखीच भर पडली आहे. त्यामुळे उच्चशिक्षित तरुण सुद्धा मिळेल ते काम मिळेल त्या वेतनात करायला तयार आहे. याचाच प्रत्यय औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात पाहायला मिळाला.

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिकी एवं सूचना प्रौद्योगिकी संस्थान आणि मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बेरोजगार युवक व युवतींसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.रोजगार मेळाव्यासाठी 3 हजार 127 इतक्या बेरोजगार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नाव नोंदणी केली होती. तर त्यापैकी 1318 विद्यार्थी रोजगार मेळावामध्ये प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित होते. ज्यात 816 बेरोजगार विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष मुलाखतीतून निवड करण्यात आली आहे.

यावेळी इंजीनियरिंग,बीटेक केलेले तरुण सुद्धा रिटेल, सेल्स, मार्केटिंग करण्यासाठी तयार होते. कमी पगार असेल तरी चालेल पण फक्त नोकरी मिळायला पाहिजे असे अनेक जण मॅक्स महाराष्ट्राच्या प्रतिनिधीसोबत बोलताना म्हणाले.तर कोरोना काळात नोकरी गमावलेले अनेक तरुण याठिकाणी पुन्हा एकदा नोकरी मिळेल या अपेक्षेने आले होते. तीन ते चार वर्षांचे अनुभव असताना सुद्धा मुलं प्रेशरच्या पगारात काम करण्यासाठी तयार असल्याचं रोजगार मेळाव्याचे आयोजक सुनिल मोटे म्हणाले.

Updated : 26 Nov 2021 10:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top