Home > News Update > कोकणातील धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी , पर्यटन व्यावसायिकांमध्ये समाधान

कोकणातील धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी , पर्यटन व्यावसायिकांमध्ये समाधान

पावसाच्या आगमनामुळे कोकणातील धबधबे वाहू लागले आहेत. या धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी होत असून त्यामुळे पर्यटन व्यवसायाला चालना मिळत आहे.

कोकणातील धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी , पर्यटन व्यावसायिकांमध्ये समाधान
X

जुन महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात हमखास पावसाळी पर्यटनाला उधाण येते. जिल्ह्यातील विविध ठिकाणचे पांढरे शुभ्र धबधबे, धरणांचे ओव्हरफ्लो होणारे पाणी, डोंगरावरून खळखळत वाहत येणाऱ्या जलधारा पर्यटकांना आकर्षित करतात. शनिवार व रविवारी जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस बरसला. त्यामुळे पावसाची आणि पाण्याची मज्जा लुटण्यासाठी अनेकजण सज्ज झाले आहेत. परिणामी अनेकांचे पावसाळी पर्यटनाचे बेत आखले जात आहेत. शिवाय पावसाळी पर्यटनावर असणारे छोटे मोठे व्यवसायिक देखिल सुखावले आहेत.

सह्याद्रीच्या उंच आणि रांगड्या डोंगररांगांनी वेढलेल्या व निसर्गसौंदर्याने नटलेल्या रायगड जिल्ह्यात पावसाळी पर्यटन म्हणजे पर्यटकांना जणु काही पर्वणीच असते. जुन महिन्यात पाऊस सुरू झाला कि पर्यटक निसर्गप्रेमींना वेध लागतात ते येथील धबधबे, वाहते पाण्याचे प्रवाह व धरणाच्हया पाण्यात चिंब भिजण्याचे व मनसोक्त पावसाचा आनंद घेण्याचे. मग त्यांची पावलं आपोआप धबधबे, समुद्र किनारे, धरणे आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांकडे वळतात. येथीलउंचावरुन कोसळणारा पाण्याचा प्रवाह, धुक्याचं वातावरण हे सारं अनुभवण्यासारखं असतं. पावसाळ्यात येथील अनेक ठिकाणे पर्यटकांनी गजबजलेली असतात. काही दंगेखोर व अतिउत्साही पर्यटकांमुळे पर्यटनाला गालबोट लागते. म्हणून मग जिल्ह्यातील झेनिथ, आशाने, जुम्मापट्टी, बेडिसगाव आडोशी, बोरगाव, परसदरी आदी धबधब्यांवर, तसेच पाली भुतिवली, कोंडाणे, पळसदरी आदी धरणांवर पर्यटकांना बंदी असते. तसेच माणगाव तालुक्यातील देवकुंड येथेहि काही दुर्घटना झाल्याने पर्यटकांना बंदी असते. यातील बहुतांश ठिकाणी कलम १४४ देखिल लावले जाते. अशा वेळी मात्र नेहमीच्या या ठिकाणांपेक्षा काही वेगळे व सुरक्षित स्पॉट्स आहेत जिथे पावसाळ्याचा मनसोक्त आनंद पर्यटक लुटतात.





पावसाळी पर्यटनाची पर्वणी पावसाळ्यात पर्यटकांचे पाय रायगड जिल्ह्याकडे वळतात ते रायगडमधील डोंगरावरून कोसळणाऱ्या मनमोहक धबधबे पाहण्यासाठी व मस्त धबधब्याखाली ओलेचिंब होण्यासाठी. ही मजा काही औरच असते. वीकेण्डला रायगडमधल्या ताम्हिणी घाट, वरंध घाट, तसेच खोपोली, कर्जतपासून फणसाड (मुरुड) व अलिबागमध्येही पर्यटक फिरत असतात. मुंबईकरांना ताम्हिणी (Tamhini ghat)व वरंध(Varandh ghat) घाट दूरचा असल्याने ते कर्जत, खोपोली तसेच अलिबाग व मुरुडकडील प्रदेशाला विशेष पसंती देतात. अलिबाग (Alibag) व मुरुडची ट्रीप म्हणजे 'डबल धमाका.' धबधब्यावरून ओलेचिंब होऊन यायचं आणि नंतर समुदावरच्या रेतीमध्ये निवांत बसायचं.

खोपोलीजवळ झेनिथचा धबधबा (Zenith waterfall)पर्यटकांना धोकादायक असल्याने बंद करण्यात आला आहे. मात्र याचवेळी कर्जत व खोपोली दरम्यान असलेल्या पळसदरी गावातील हा धबधबा पर्यटकांचं आकर्षण होत चालला आहे. झेनिथ पेक्षा हा धबधबा जवळ आहे. मुंबईहून खोपोली लोकल पकडल्यानंतर कर्जत स्टेशनच्या पुढील पहिले स्टेशन पळसदरी लागते. स्टेशनपासून दोन कि.मी. अंतरावर पळसदरी गावाच्या मागे डोंगराच्या कुशीत हा धबधबा आहे. पळसदरी स्टेशनवर जेवणाची सोय नसली तरी गावामध्ये राहण्याची व जेवणाची घरगुती व्यवस्था होते. चुलीवरच्या जेवणाची लज्जत पर्यटकांच्या आनंदात अधिकच भर घालते. धरणाकडे जाताना 'रेल्वेधरण' म्हणून ओळखलं जाणारं १९०५ सालचं ब्रिटिशकालीन धरण पर्यटकांचं लक्ष वेधून घेते. या धरणावरून गावाकडे रस्ता जातो. गावात विनंती केल्यास जेवणाची व्यवस्था केली जाते. अलिबाग व मुरुड येथील फणसाड अभयारण्यातील धबधबे देखील पर्यटकांचे आकर्षण होत चालले आहे. अलिबागपासून ३० कि.मी. व मुरुडपासून २० कि.मी.वर असलेल्या फणसाड अभयारण्यातल्या धबधब्यांनाही पर्यटक भेट देतात. धबधब्यात भिजण्याच्या मजेबरोबरच अभयारण्याची सैर करता येते. तसेच मुरुड व काशीदच्या समुदकिनाऱ्यावरही भटकंती करता येते. फणसाडमध्ये राहण्याची व जेवणाची व्यवस्था विनंतीवरून होऊ

धोकादायक पर्यटनस्थळांवर जाण्यापेक्षा जिल्ह्यातील सुरक्षित धबधबे, ओढे व धरणे येथे पावसाळी पर्यटनासाठी पर्यटक पसंती देतात. येथील धरणांच्या ओसंडून वाहणाऱ्या पाण्यात मौजमजा घेण्यासाठी पर्यटक येथे गर्दी करत आहेत. रविवारी व सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे येत असतात. थोडी खबरदारी व अतीउत्साह टाळल्यास शाळकरी, लहान मुले, महिला व तरुणांसाठी ही ठिकाणे सुरक्षित आहेत.





देवकुंड धबधबा सिक्रेट पॉईंट व ताम्हिणी घाट या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश जारी

पोलीस निरीक्षक माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाणे हद्दीतील रवाळजे दूरक्षेत्र अंतर्गत, मौजे भिरा गावचे हरीतील "देवकुंड धबधबा" व सणसवाडी गावचे हद्दीतील "सिक्रेट पॉईंट" व "ताम्हिणी घाट" हा परिसर पावसाळी हंगामात पुणे-मुंबई व महाराष्ट्रातील पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे.

ही ठिकाणे नैसर्गिक दुर्गम भागात असल्यामुळे तेथे कोणत्याही सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. सन 2017 पावसाळी हंगामात या ठिकाणी भेट दिलेल्या पर्यटकांमधील 4 पर्यटक हे नदीच्या प्रवाहात वाहत जाऊन मृत्यूमुखी पडले होते. तसेच सुमारे 55 पर्यटक हे अचानक पाण्याचा जोर वाढल्याने नदीपात्रात अडकले होते. सन 2018 चे पावसाळी हंगामातदेखील फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेशाची मुदत संपल्यानंतर 3 पर्यटक हे नदीच्या प्रवाहात वाहून गेले होते व मृत्युमुखी पडले होते.

सन 2022 मध्ये एक पर्यटक नदीच्या पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने पाण्यात वाहून जाऊन मयत झाला आहे. त्याचबरोबर सिक्रेट पॉईंट या ठिकाणी सुरक्षा 'व्यवस्थेचा अभाव असल्याने पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते व ताम्हिणी घाट हा धोकादायक वळणांचा व तीव्र उताराचा असल्याने तसेच दरड कोसळण्याचा संभव असल्याने पर्यटकांची वित्त व जीवित हानी होऊ शकते. या कारणांमुळे "देवकुंड धबधबा", "सिक्रेट पॉईंट" व "ताम्हिणी घाट" ही पर्यटन स्थळे पर्यटकांच्या दृष्टीने सुरक्षित नसल्याने ह्या परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश माणगाव उपविभागीय अधिकारी उमेश बिरारी यांनी दि. 10 जून 2023 ते दि. 31ऑक्टोबर 2023 या कालावधीसाठी जारी केला आहे.







या दरम्यान पावसामुळे निर्माण झालेले नैसर्गिक धबधब्याचे परिसरामध्ये मद्यपान करणे किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे य उघडया जागेवर मद्य सेवन करणे. पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धवधवे, दन्यांचे कठडे, धोकादायक वळणे, इ. ठिकाणी सेल्फी काढणे व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे तसेच रहदारीवर परिणाम करणाऱ्या ठिकाणी फोटोग्राफी करणे. पावसामुळे वेगाने वाहणारे धोकादायक पाण्यात / खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे. धबधब्याच्या वरील बाजूला जाणे अथवा धबधब्याच्या धोकादायकरित्या पडणाऱ्या पाण्याच्या झोताखाली बसणे. धोकादायक स्थिती निर्माण होईल अगर जिवित हानी होईल, असे धबधबे किंवा तलाव याठिकाणी पाण्यात उतरणे. रहदारीच्या ठिकाणी तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबवणे. वाहने अतिवेगाने व वाहतूक निर्माण होईल अशा प्रकारे चालविणे, वाहनाची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे. सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या, थर्माकोलचे व प्लॅस्टीकचे साहित्य उघड्यावर इतरत्र फेकणे. सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगलटवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य व अश्लिल हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल, असे कोणतेही वर्तन करणे, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजवणे, डी.जे.सिस्टिम वाजवणे, गाडीमधील स्पिकर/ उफर वाजवणे व त्यामुळे ध्वनीप्रदूषण करणे. ज्या कृतीमुळे ध्वनी, वायू व जल प्रदूषण होईल अशी कोणतीही कृती करणे. धरण / तलाव / धबधब्याच्या 1 कि.मी. परिसरात दुचाकी / तीन चाकी / चार चाकी / सहा चाकी वाहनांनी प्रवेश करणे (अत्यावश्यक सेवा वगळून), या अशा प्रकारचे वर्तन करण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे, याची नागरिकांनी गांभीर्याने नोंद घ्यावी, असे आवाहन माणगाव उपविभागीय अधिकारी उमेश बिरारी यांनी केले आहे.





पावसाला दमदार सुरुवात झाल्याने पावसाळी पर्यटनाला आता बहर येईल. त्यामुळे व्यवसाय चांगला होईल. पावसाने आणखी जोर धरल्यास पुढील महिन्यात पावसाळी पर्यटन बहरेल. असा विश्वास उद्धर येथील कृषी व पावसाळी पर्यटन आयोजक तुषार केळकर यांना वाटत आहे.

Updated : 25 Jun 2023 11:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top