Home > News Update > 'देशाच्या गृहमंत्र्यांना राष्ट्रीय सुरक्षेसाठी कोणालाही भेटण्याचा अधिकार आहे, मात्र...'

'देशाच्या गृहमंत्र्यांना राष्ट्रीय सुरक्षेसाठी कोणालाही भेटण्याचा अधिकार आहे, मात्र...'

देशाच्या गृहमंत्र्यांना राष्ट्रीय सुरक्षेसाठी कोणालाही भेटण्याचा अधिकार आहे, मात्र...
X

'केंद्रीय गृहमंत्र्यांनी पंजाबच्या लोकनियुक्त मुख्यमंत्र्यांना डावलून काँग्रेसने दूर केलेल्या व आमदारांचा पाठिंबा गमावलेल्या अमरिंदर सिंग यांच्याशी सीमा सुरक्षेबाबत चर्चा करणे बरोबर नाही,' असं म्हणत शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून कॅ. अमरिंदर आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

देशाच्या गृहमंत्र्यांना राष्ट्रीय सुरक्षेसाठी कोणालाही भेटण्याचा अधिकार आहे, मात्र, अमरिंदर आता जी चिंता व्यक्त करीत आहेत त्याप्रमाणे पंजाबच्या सीमेवर काय घडले आहे? लडाख, कश्मीर सीमेप्रमाणे त्या सीमेवरही कोणी घुसखोरी करू लागले आहे काय? असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.

कुठे चीन तर कुठे पाकिस्तान रोज घुसखोरी करीत आहे, पण मुख्यमंत्रीपद गेल्यावर अमरिंदर यांना सीमा सुरक्षेबाबत जाग आली.असा टोला शिवसेने लगावला आहे. 'आता मी काँग्रेसमध्ये थांबणार नाही व भाजपातही जाणार नाही असे पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांनी स्पष्ट केले आहे. पण बाहेर राहून ते काँग्रेसचा घात करणार, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर त्यांनी ठरवलेले दिसते.असेही सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. पंजाबातील घडामोडींनी काँग्रेसचे भवितव्य टांगणीला लागले आहे.मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर कॅ. अमरिंदर सिंग दिल्लीत गेले,' तुम्ही भाजपच्या नेत्यांना भेटणार का?'या प्रश्नावर कॅ. अमरिंदर सिंग म्हणाले की, मी भाजपच्या नेत्यांना भेटणार नाही मात्र दुसऱ्याच दिवशी ते अमित शाह यांना भेटले.शेतकरी आंदोलन, सीमा सुरक्षा यावर चर्चा केली हे धादांत खोटे आहे असं शिवसेनेने म्हटले आहे.

Updated : 2 Oct 2021 2:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top