Home > News Update > तिसऱ्या लाटेला आता सुरुवात - राजेश टोपे

तिसऱ्या लाटेला आता सुरुवात - राजेश टोपे

तिसऱ्या लाटेला आता सुरुवात झाली असून या लाटेचा प्रादुर्भाव कधीपर्यंत राहील हे सांगता येत नाही,पण जानेवारी अखेरपर्यंत ही लाट कायम राहील असा अंदाज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे.

तिसऱ्या लाटेला आता सुरुवात  - राजेश टोपे
X


सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यांतील शाळा बंद करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांची काळजी घेणं गरजेचं आहे.त्यामुळे पालकांनी सरकारला समजून घेऊन सरकारला सहकार्य करावे.असं आवाहन टोपे यांनी करत शाळा बंदच राहतील असं म्हटलं आहे.

राज्यातील अनेक राजकीय नेते कोरोना नियम आणि निर्बंधाच पालन करत नसल्याचं समोर आलं आहे त्यामुळे सर्वांनी सहकार्य करून नियम पाळावे आणि महिनाभर राजकीय पक्षांनी आपापले कार्यक्रम रद्द करावे असं आवाहन देखील टोपे यांनी केलं आहे.

राज्यात कोरोना रुग्णांत वाढ झाल्यानेच निर्बंध लावले असून लोकांची काळजी घेणे गरजेचं आहे. जान है तो जहान है असं सांगत उद्योग सुरू असलेच पाहिजे पण काळजी घेणंही महत्वाचं ,आहे असं टोपे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या टिकेला उत्तरं देत म्हटलं आहे.

आज मनसुख मांडवीय यांच्या सोबत झालेल्या बैठकीत राज्यातील कोरोना स्थिती,सद्य उपलब्ध असलेली साधन सामुग्री याबाबत चर्चा झाली असून ECRP 2 चा निधी खर्च करण्याबाबत चर्चा झाली असून आता निधी खर्च करण्याला वेग येईल असा विश्वास टोपे यांनी व्यक्त केला.राज्यातील नादुरुस्त ऑक्सिजन प्लांट दुरुस्त करून घेण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिल्याचं ते म्हणाले.बूस्टर डोस, लहान मुलांना लसीकरण वेग वाढवण्यासाठी सूचना दिल्याचं टोपे शेवटी म्हणाले.

Updated : 10 Jan 2022 1:57 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top