Home > News Update > देशात 187 जिल्ह्यात रुग्ण संख्या घटली, काय आहे देशातील सद्यस्थिती?

देशात 187 जिल्ह्यात रुग्ण संख्या घटली, काय आहे देशातील सद्यस्थिती?

देशात 187 जिल्ह्यात रुग्ण संख्या घटली, काय आहे देशातील सद्यस्थिती?
X

देशात कोरोना महामारीला रोखण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. आतापर्यंत 18 कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. तर देशातील कोरोनावर केल्या जाणाऱ्या उपाययोजनांमुळं देशातील काही जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झालं आहे. आज केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि नीती आयोगाने संयुक्त पत्रकार परिषद घेत देशातील कोरोनाच्या स्थिती संदर्भात आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी माहिती दिली.

देशातल्या 187 जिल्ह्यात गेल्या 2 आठवड्यापासून करोना केसेसचे प्रमाण कमी झाले आहे. 24 राज्यात पॉझिटीव्हिटी रेट 15 टक्के आहे. तर देशात सद्यस्थितीला 12 राज्यामध्ये एक लाखाहून अधिक कोरोना केसेस आहेत.

बिहार मध्ये एक लाखांपेक्षा कमी रुग्णसंख्या झाली आहे.

तर देशातील 16 राज्यामध्ये सक्रीय रुग्णांची संख्या 50 हजाराहून कमी झाली आहे. त्यामध्ये राजस्थान, बिहार, छत्तीसगढ, यूपी, दिल्ली मध्ये नवीन केसेसचं प्रमाण कमी झाले आहे.

Updated : 13 May 2021 5:49 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top