Home > News Update > राज्यात २४,१३६ कोरोनाचे नवीन रुग्ण, मृत्यूचा आकडा चिंताजनक

राज्यात २४,१३६ कोरोनाचे नवीन रुग्ण, मृत्यूचा आकडा चिंताजनक

राज्यात २४,१३६ कोरोनाचे नवीन रुग्ण, मृत्यूचा आकडा चिंताजनक
X

आज राज्यात २४,१३६ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यात आज ६०१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६१% एवढा आहे. आज ३६,१७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण ५२,१८,७६८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.७६% एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,३५,४१,५६५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५६,२६,१५५ (१६.७७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २६,१६,४२८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २०,८२९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण -

राज्यात आज रोजी एकूण ३,१४,३६८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्ण


Updated : 25 May 2021 5:49 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top