Home > News Update > जळगाव कोविड रुग्णालयात रुग्णाची आत्महत्या

जळगाव कोविड रुग्णालयात रुग्णाची आत्महत्या

जळगाव कोविड रुग्णालयात रुग्णाची आत्महत्या
X

राज्यात कोरोनाचे मोठे हॉटस्पॉट बनलेल्या जळगावमध्ये पुन्हा एकदा एक धक्कादायक प्रकार घडला आहे. जळगावच्या कोविड रुग्णालयात एका रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जिल्हा कोविड रुग्णालयातील वॉर्ड क्र. ६ मध्ये कडुबा नकुल घोंगडे (वय ५०, रा. पहूर, ता. जामनेर) या कोरोनाबाधित रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

गुरूवारी मध्यंरात्री एक वाजता ही घटना घडली असून दोन तास म्रुतदेह लटकलेल्या अवस्थेत होता. या घटनेमुळं इतर रुग्णांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, कोविड रुग्णालयात कर्मचारी होते की नाही हा देखील मुद्दा आता पुन्हा ऐरणीवर आला आहे. या रुग्णाने आत्महत्या का केली याचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही.

आत्महत्या केलेला रुग्ण दोन दिवसांपूर्वीच पहूर येथून जळगावच्या कोविड रुग्णालयात दाखल झाला होता. गुरुवारी त्यांच्या आरटीपीसीआर चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आले होते. रिपोर्ट येण्यागोदारच हा प्रकार घडल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने मॅक्समहाराष्ट्रशी बोलतांना दिली.

काही दिवसांपूर्वी याच कोविड रुग्णालयात बेपत्ता झालेल्या 80 वर्षाच्या कोरोनाबाधीत वृद्ध महिलेचा मृतदेह आठ दिवसानंतर बाथरूममध्ये सापडला होता, यामुळं या कोविड रुग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला होता.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट झाला असून दररोज हजार ते अकराशे रुग्णांची भर पडत आहे. रुग्णालयेही आता अपुरी पडू लागली आहेत. आतापर्यंत 36 हजार लोक बाधीत झाले आहेत तर मृतांचा आकडा हजाराच्या जवळ पोहोचला आहे.

Updated : 11 Sept 2020 12:21 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top