आंबा, द्राक्षे,टॉमेटो,संत्री च्या विक्रीची व्यवस्था करा – प्रविण दरेकर

राज्यात कोरोना व्हायरस मुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्यातील जनता कोरोना व्हायरस शी लढा देत आहे. कोरोना व्हायरस मुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे. मात्र, द्राक्षे, आंबा, टॉमेटो,संत्री यासारखी शेतकऱ्यांच्या शेतीत सडण्याची भीती आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळं सरकारनं आंबा, द्राक्षे,टॉमेटो,संत्री, शेतमाल व इतर फळे- फुले व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.

या मालाची साठवण व विक्रीची तात्काळ व्यवस्था जर तात्काळ झाली नाही तर राज्यातील शेतकरी उध्वस्त होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. तसंच सरकारने कापूस व इतर उत्पादक, यांच्या मालाचाही दर निश्चित करुन विक्रीची व्यवस्था लावाण्या संदर्भात शासनाने तात्काळ कार्यवाही करावी . अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. दरम्यान दरेकर यांनी नुकतंच राज्य सरकारने दररोज १० लाख लिटर दुध प्रति लिटर २५ रुपयांनी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत दरेकर यांनी राज्य सरकारचे अभिनंदन केले आहे.