Top
Home > News Update > राज्यात परिस्थिती गंभीर: शरद पवार

राज्यात परिस्थिती गंभीर: शरद पवार

राज्यात परिस्थिती गंभीर: शरद पवार
X

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. याबाबत आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गेल्या वर्षीचा कोरोनाचा वेग आणि यंदाच्या वेगात मोठा फरक असल्याचं सांगितलं.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मुंबईमध्ये ३४ हजार २५९ रूग्ण होते. तर आजची मुंबईची परिस्थिती पाहिली तर मुंबईमध्ये ५९ हजार २६८ रुग्ण आहेत. तर सप्टेंबरमध्ये २०२० ठाण्यात ३८ हजार ३८८ रुग्ण होते. तर सध्या ठाण्यात ६१ हजार १२७ रुग्ण आहेत. पुण्यात सप्टेंबर २०२० मध्ये८२ हजार १७२ रुग्ण होते. तर पुण्यामध्ये सध्या एप्रिलमध्ये ८४ हजार ३०९ रुग्ण आहेत. असं म्हणत शरद पवार यांनी राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेपक्षा दुसरी लाट मोठी असल्याचं म्हटलं आहे.

Updated : 8 April 2021 5:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top